शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

भारतीय संस्कृतीचं कौतुक वाटून जपानी जोडप्यानं केलं हिंदू पध्दतीनं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 2:07 PM

जपानी जोडप्याने भारतात येऊन केलेल्या या हिंदु पध्दतीतील विवाहामुळे ते चर्चेचा विषय बनले आहेत

ठळक मुद्देजपानच्या एका जोडप्यानं भारतात येऊन चक्क हिंदू पद्धतीने तामिळनाडूमध्ये लग्न केलंय.भारतीय लग्नपद्धतीवर प्रभावित होत हिंदु पध्दतीने लग्न करण्यासाठी ते खास टोकियोमधून मदुराईला आले होते.यावेळी त्यांच्या काही नातेवाईक तर काही स्थानिक परीचित उपस्थित होते.

मदुराई : तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगविषयी आजवर ऐकलं असेल. पण डेस्टिनेश वेडिंगसोबतच तिकडच्या संस्कृतीनुसार कोणी लग्न केलेलं तुम्ही ऐकलं आहे? जपानच्या एका जोडप्यानं चक्क हिंदू पद्धतीने तामिळनाडूमध्ये लग्न केलंय. भारतीय लग्नपद्धतीवर प्रभावित होत या जोडप्याने अशाप्रकारे लग्न केलंय. त्यासाठी ते खास टोकियोमधून मदुराईला आले होते.

आणखी वाचा - ब्रेस्ट कॅन्सर झाला असतानाही तिने सोडली नाही जिद्द, मृत्यूच्या काही तासापूर्वी रुग्णालयात बेडवरच केलं लग्न

दि हिंदु या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चिहारू आणि युटो निआंगा असं या नवजोडप्याचं नाव आहे. २०१४ साली चिहारू ही तामिळनाडूमध्ये भाषेवर संशोधन करण्यासाठी आली होती. तिला तामिळनाडू आणि जपानी भाषेत काय साम्य आहे यावर संशोधन करायचं होतं. या संशोधनादरम्यान तिने तामिळनाडूमधील संस्कृती जाणून घेतली. तेव्हा तिनं इकडची लग्नाची पद्धतही शिकून घेतली. त्यामुळे ती या पद्धतीवर चांगलीच प्रभावित झाली होती. खरंतर या जोडप्याचं लग्न १ एप्रिल २०१७ साली जपानमध्ये झालं होतं. पण भारतीय पद्धतीला प्रभावित होऊन त्यांनी पुन्हा लग्न करायचं ठरवलं. या लग्नाला त्यांचे काहीच पाहुणे उपस्थित होते. तसंच, तामिळमधल्या त्यांच्या काही परिचितांनी हा विवाह संपन्न होण्यासाठी फार मदतही केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चिहारूला अस्खलित तामिळ भाषा बोलता येते. त्यांच्या लग्नासाठी तामिळ पद्धतीने छान मंडप घालण्यात आला होता. व्यासपीठावर फुलांची आरास केली होती. वधूने खास भरजरी कपडे, दागिने घातले होते. त्यांनी अग्नीच्या साक्षीने एकमेंकासोबत सप्तपदीही केली. एवढंच नव्हे तर त्यांच्या संस्कृतीत असलेली काशियात्रा ही एक प्रथाही त्यांनी पार पडली. चिराहूचं कन्यादानही तिच्या वडिलांनी केलं. 

जपानमध्ये चर्चमध्ये लग्न करण्याची पध्दत आहे. त्यामुळे त्यां दोघांसाठी ही पद्धत फार वेगळी वाटली. म्हणूनच आपलंही अशाच पद्धतीने लग्न व्हावं याकरता त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातला. चिराहूच्या नवऱ्यालाही ही पद्धत फार भावली म्हणूनच त्याच्या घरच्यांनीही या पद्धतीला होकार दिला. खास लग्नासाठी ते टोकियोवरून मदुराईमध्ये आले होते. भारतीय लग्न पद्धत प्रत्येकालाच आवडते. यात जरा जास्त खर्च होत असला तरीही लग्नांच्या विधीमधून वधु-वरांवर अनेक प्रकारच्या विधी आणि संस्कार केल्या जातात. त्यामुळे आधीही अनेक परदेशी पर्यटकांनी भारतीय पद्धतीच्या लग्नाचं कौतुक केलंय. 

 

टॅग्स :Indian Traditionsभारतीय परंपराJapanजपानTamilnaduतामिळनाडू