a woman gets married before 18 hours of her death | ब्रेस्ट कॅन्सर झाला असतानाही तिने सोडली नाही जिद्द, मृत्यूच्या काही तासापूर्वी रुग्णालयात बेडवरच केलं लग्न

वॉशिंग्टन - अमेरिकेतील एका तरुणीचे रुग्णालयातील बेडवर लग्नाच्या कपड्यांमध्ये असलेले फोटो सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. हे फोटो पाहून यामध्ये आर्श्चर्य वाटण्यासारंख काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल, पण यामागे एक वेदनादायक कहाणी आहे. रुग्णालयात बेडवर हसताना दिसणारी ही तरुणी आता या जगात नाही. वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, मात्र मृत्यूच्या फक्त 18 तासापूर्वीच ती विवाहबंधनात अडकली होती. तिच्या वैवाहिक जीवनाचं आयुष्य साधं एक दिवसही नव्हतं. 

हिथर मोजर असं या तरुणीचं नाव आहे. तिला कॅन्सर झाला होता. मे 2015 मध्ये एका डान्स क्लासमध्ये तिची आणि डेव्हिडची भेट झाली होती. यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. एखाद्या सामान्य जोडप्याप्रमाणे दोघांचं आयुष्य सुरु होते. येणा-या आयुष्याची तयारी दोघे करत होते. मात्र अचानक एक बातमी येते आणि दोघांचंही आयुष्य बदलून जातं. 23 डिसेंबर 2016 ला हिथरला कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि दोघांच्या पायाखालून जमीन सरकली. एका क्षणात सर्व गोष्टी बदलल्या. खरं तर अशावेळी अनेकजण आपल्या सोबतीची साथ सोडून देतात. मात्र डेव्हिडने अशावेळीही हीथरसमोर आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा निर्णय घेतला. एक दिवस ठरवून डेव्हिडने हिथरसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रेमाची कबुली दिली. 

काही वर्षांनी लग्न करायचं दोघांनी ठरवलं होतं, वैद्यकीय तपासणी असता हिथरची तब्बेत अजून खराब झाली असल्याचं निष्पन्न झालं. कॅन्सरचा फैलाव मेंदूपर्यंत पोहोचला होता. हिथर आणि डेव्हिडने 30 डिसेंबरला लग्न करायचं ठरवलं होतं, पण डॉक्टरांनी त्यांना लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला. यानंतर 22 डिसेंबरला लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यंत साध्या पद्धतीने नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांनीलग्न केला. लग्नात घेतलेली शपथ हे हिथरच्या तोंडून आलेले शेवटचे शब्द ठरले. 

लग्नानंतर काही वेळातच हिथरची तब्बेत बिघडली. 18 तासानंतर हिथरचं निधन झालं. डेव्हिडला आजही तिचे अखेरचे शब्द आठवणीत आहेत. डेव्हिडने आपल्याला आयुष्यात संघर्ष करण्याची ताकद मिळाल्याचं सांगितलं आहे. पुढचं आयुष्य तिच्या आठवणींसोबत काढणार असल्याचंही तो बोलला आहे. दोघांच्या एका मैत्रिणीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो अपलोड केले आहेत. हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. 


Web Title: a woman gets married before 18 hours of her death
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.