शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 06:32 IST

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईमागील भूमिकेला जपान व संयुक्त अरब अमिरातीने भक्कम पाठिंबा व्यक्त केला.

टोकियो/अबुधाबी: काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईमागील भूमिकेला गुरुवारी जपानसंयुक्त अरब अमिरातीने भक्कम पाठिंबा व्यक्त केला. जनता दलाचे खासदार संजय झा आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळांनी दोन्ही देशांकडे भूमिका मांडताना दहशतवादाला पाकिस्तानचे कसे पाठबळ आहे, याचे सबळ दाखले दिले. 

दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडण्यासाठी सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगभरातील ३३ विविध देशांच्या दौऱ्यावर असून, या त्यापैकी ही दोन शिष्टमंडळे गुरुवारी या दोन देशांच्या दौऱ्यावर होती. 

अरब अमिरातीच्या दौऱ्यावर असलेल्या शिष्टमंडळात मननकुमार मिश्रा, एस. एस. अहलुवालिया, अतुल गर्ग, बांसुरी स्वराज  सस्मित पात्रा, ई. टी. मोहम्मद बशीर, माजी राजदूत सुजान आर. चिनॉय आणि तेथील भारतीय राजदूत संजय सुधीर यांचा समावेश आहे. 

जपानच्या शिष्टमंडळात अपराजिता सारंगी, बृजलाल प्रधान बरुआ, हेमांग जोशी, माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद, खा. अभिषेक बॅनर्जी, जॉन ब्रिटास यांचा समावेश आहे. 

दहशतवादाला थारा नाहीच : ताकेशी इवाया 

भारतीय शिष्टमंडळाने जपानचे परराष्ट्रमंत्री ताकेशी इवाया यांच्याशी चर्चा केली. यावेळी इवाया यांनी कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे सांगून भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला. या लढाईत भारत आणि जगाला संपूर्ण पाठिंबा राहील, अशी हमी दिली.

जागतिक धोका : नुएमी 

अरब अमिरातीचे संरक्षण व परराष्ट्रविषयक समितीचे अध्यक्ष अली राशीद अल नुएमी यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, हा दहशतवाद केवळ एका देशाला नव्हे, तर संपूर्ण जगासाठीच धोका असल्याचे स्पष्ट करून या लढाईत भारताला संपूर्ण पाठिंबा देऊ केला. 

‘वेपन ऑफ मास डिस्ट्रॅक्शन’

परदेशात पाठवण्यात येणाऱ्या राजनैतिक शिष्टमंडळांचा उपयोग केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रॅक्शन’ म्हणजे जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीबाबत केलेल्या दाव्यांवर पंतप्रधानांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही काँग्रेसने केली.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरShrikant Shindeश्रीकांत शिंदेIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीJapanजपान