'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:22 IST2025-08-06T16:22:03+5:302025-08-06T16:22:43+5:30
६ मे रोजीच्या रात्री भारतीय लष्कराने २२ मिनिटांचे ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात जैशच्या मुख्यालयचे मोठे नुकसान झाले.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे लपलेले ठिकाण उद्ध्वस्त केले. यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदची सुभान अल्लाह मशीदही उद्ध्वस्त केली. हे दहशतवाद्यांचे मुख्यालय होते. दरम्यान, आता हे मुख्यालय पुन्हा एकदा बांधण्यासाठी दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याने मोहीम सुरू केल्याचे समोर आले. यासाठी तो ऑनलाइन निधी गोळा करत आहे.
याबाबत सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रामध्ये पाकिस्तानातील बहावलपूरमधील सुभान अल्लाह मशीद पुन्हा बांधली जात आहे. सुभान अल्लाह मशीद हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे आणि पैसे गोळा करावेत असा दावा केला आहे. कोणी किती दान केले हे कोणालाही कळू नये असेही पोस्टमध्ये म्हटले होते.
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
पाकिस्तानी वृत्तपत्रात आलेल्या वृत्तानुसार, 'या मोहिमेमुळे जमिनीचे अनेक भाग स्वर्ग बनतील, शहीद मशिदी पुन्हा हसतील आणि त्यांचे वैभव परत येईल, असं जैशचा प्रमुख मसूद अझहर याने या पोस्टमध्ये म्हणाला आहे. 'जिहाद'साठी आसुसलेल्या वेड्या लोकांसाठी नवीन मार्ग उघडतील, असंही त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. मसूद अझहरची ही पैसे मागण्याची मोहीम आजपासून सुरू झाली आहे.
दहशतवादी तळ १५ एकरांत होता
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारल्यानंतर, भारतीय सैन्याने ६ आणि ७ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. २२ मिनिटांच्या या कारवाईत भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुभान अल्लाह मशीद. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहबलपूर येथे असलेली ही मशीद जैश-ए-मोहम्मदचे सर्वात महत्त्वाचे दहशतवादी केंद्र होते, हे १५ एकर परिसरात पसरलेले आहे.