आपल्यासारख्या दिसणाऱ्या मुलाला जॅक मांनी दिली मदत
By Admin | Updated: November 13, 2016 21:42 IST2016-11-13T21:42:43+5:302016-11-13T21:42:43+5:30
प्रसिद्ध व्यक्तीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता चेहरा असलेल्या व्यक्ती आढळल्याची अनेक उदाहरणे समोर येत असतात.

आपल्यासारख्या दिसणाऱ्या मुलाला जॅक मांनी दिली मदत
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 13 - प्रसिद्ध व्यक्तीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता चेहरा असलेल्या व्यक्ती आढळल्याची अनेक उदाहरणे समोर येत असतात. चीनमधी आघाडीची कंपनी असलेल्या अलीबाबाचे सर्वेसर्वा असलेल्या जॅक मा यांच्या बालपणीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता चेहरा असलेला एक मुलगा सापडला असून, या मुलाला शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय जॅक मा यांनी घेतला आहे.
पूर्व चीनमधील जियांझी प्रांतातील योंगफेंग गावातील राहणाऱ्या या मुलाचा चेहरा जॅक मा यांच्या चेहऱ्याशी बऱ्यापैकी मिळताजुळता आहे. गेल्या वर्षी गावातील रहिवाशांनी या मुलाचा मिनी जॅक मा असा उल्लेख करून व्हिडीओ प्रसारित केला होता. मिनी जॅक मा असा उल्लेख होत असलेल्या या मुलाच्या चेहऱ्याची नेटीझन्सकडून जॅक मा यांच्या चेहऱ्याशी तुलना होत आहे. दुर्दैवाने या मुलाच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्याची आई पोलिओग्रस्त असून, वडलांचे पाय अपघातात गेले आहे. तर त्याची आजी अल्झायमर या आजाराने ग्रस्त आहे.
जॅक मा यांना या मुलाबद्दल समजल्यावर त्यांनी पुढाकार घेत या आठ वर्षीय मुलाला शिक्षणासाठी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.