शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:09 IST2026-04-10T12:07:47+5:302026-04-10T12:09:53+5:30

US Iran Ceasefire Islamabad talk : अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वन्स इस्लामाबादमध्ये चर्चा करणार आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्थीने होणाऱ्या या चर्चेकडे जगाचे लक्ष.

J. D. Vance's plane leaves for Pakistan for peace talks, Iran says there is no point in talking... | शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...

शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...

गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या भीषण संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर, आता प्रत्यक्ष शांतता चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वेन्स हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे रवाना झाले आहेत. या चर्चेत पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावणार असल्याने दक्षिण आशियातील राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. अशातच इराण या चर्चेला काहीच अर्थ नसल्याचे सांगत असल्याने या सीझफायर चर्चेवर संशयाचे ढग दाटू लागले आहेत. 

शनिवारपासून (११ एप्रिल २०२६) इस्लामाबादमध्ये ही ऐतिहासिक चर्चा सुरू होणार आहे. जे. डी. वेन्स यांच्यासोबत या शिष्टमंडळात विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि राष्ट्राध्यक्षांचे जावई जॅरेड कुशनर यांचाही समावेश आहे. दुसरीकडे, इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करणार असल्याचे समजते.

पाकिस्तानची भूमिका आणि सुरक्षा व्यवस्था
या चर्चेसाठी इस्लामाबादला जणू 'किल्ल्याचे' स्वरूप आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांशी असलेल्या संबंधांमुळे पाकिस्तानने या संकटात मध्यस्थ म्हणून पुढाकार घेतला आहे. मात्र, या चर्चेत 'लेबनॉन' विषयाचा समावेश असेल की नाही, यावरून इराण आणि अमेरिका यांच्यात अद्याप मतभेद आहेत.

युद्धविराम की कायमस्वरूपी शांतता?
सध्या हा युद्धविराम केवळ १४ दिवसांसाठी आहे. या काळात दोन्ही बाजू अणू कार्यक्रम, प्रादेशिक सुरक्षा आणि व्यापारावरील निर्बंध यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. जर ही चर्चा यशस्वी झाली, तर मध्य पूर्वेतील युद्धाचे ढग ओसरू शकतात. मात्र, इस्रायलने अद्याप आपला पवित्रा मवाळ केलेला नसल्याने या शांतता चर्चेच्या यशाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title : अमेरिका-ईरान शांति वार्ता: वेन्स पाकिस्तान रवाना, ईरान संशयित

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच, उपराष्ट्रपति वेन्स शांति वार्ता के लिए पाकिस्तान में हैं। ईरान ने संदेह व्यक्त किया, जिससे युद्धविराम चर्चाओं पर संदेह पैदा हो गया। पाकिस्तान परमाणु कार्यक्रमों और क्षेत्रीय सुरक्षा पर ध्यान केंद्रित करते हुए मध्यस्थता करता है। इजरायली आरक्षणों के बावजूद, दुनिया स्थायी शांति की उम्मीद कर रही है।

Web Title : US-Iran Peace Talks: Vance Heads to Pakistan, Iran Skeptical

Web Summary : Amid US-Iran tensions, VP Vance is in Pakistan for peace talks. Iran expresses skepticism, casting doubt on ceasefire discussions. Pakistan mediates, focusing on nuclear programs and regional security. The world watches, hoping for lasting peace, despite Israeli reservations.