शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

 मोदी भ्रष्टाचारात अडकले हे चांगलंच झालं, मसूद अझहर बरळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 14:12 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारात अडकले, हे चांगलंच झालं, असे विधान जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याने केले आहे.

इस्लामाबाद - राफेल विमान करारामधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून केंद्रातील मोदी सरकार सध्या अडचणीत आले आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारात अडकले, हे चांगलंच झालं, असे विधान जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याने केले आहे.जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याने एक ऑडिओ टेप जारी केली आहे. या टेपमधून त्याने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गरळ ओकली आहे. तसेच जर पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर लादलेले निर्बंध हटवले तर आपले काश्मिरी मुजाहिद्दीन भारताला योग्य धडा शिकवतील, अशी वल्गना त्याने केली आहे.  गेल्या काही काळापासून भारताकडून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताने दहशतवादाविरोधात सक्त भूमिका घेतली आङे. त्यामुळे दहशतदवाद्यांचा तीळपापड झाला आहे. त्या संतापातूनच मसूद अझहरने भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तान सरकारने जर आमच्यावरील सर्व बंधने सहा महिन्यांसाठी शिथिल केली, तर आम्ही भारताला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. भारत पाकिस्तानला वरवर धमक्या देतो. मात्र स्वत: भयाने ग्रासले आहे, असे मसूद अझहरने म्हटले आहे. तसेच  भारतातील एका शक्तीशाली लॉबीच्या दबावामुळेच पाकिस्तानी सरकार भारतासोबत चर्चा करते, असा आरोपही त्याने केला. या ऑडिओ क्लिपमधून मसूद अझहरने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातही गरळ ओकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराच्या आरोपाड अडकले हे चांगलेच झाले. आता मोदींनी लष्करप्रमुखांना पुढे केले आहे. ते पाकिस्तानला धकम्या देत आहेत. मात्रा आम्हाला भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध नको आहे. आमचे मुजाहिद्दीन केवळ भारतालाच धडा शिकवत आहेत, अशी विधाने अझहरने केली आहेत.  पाकिस्तानने भूतकाळात केलेल्या चुकांमुळेच भारताचा आत्मविश्वास वाढला आहे, असेही त्याने म्हटले आहे.  

टॅग्स :masood azharमसूद अजहरJaish e Mohammadजैश ए मोहम्मदPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी