बुडत्या बँकांचा प्रश्न अन् बायडेन यांनी घेतला काढता पाय; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 05:46 IST2023-03-15T05:46:00+5:302023-03-15T05:46:16+5:30

सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानंतर बँकिंग संकटांशी संबंधित काही प्रश्न जो बायडेन यांना विचारण्यात आले होते.

issue of sinking banks was taken up and president joe biden left | बुडत्या बँकांचा प्रश्न अन् बायडेन यांनी घेतला काढता पाय; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बुडत्या बँकांचा प्रश्न अन् बायडेन यांनी घेतला काढता पाय; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पत्रकार परिषदेदरम्यान प्रश्नांपासून पळ काढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वास्तविक, सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानंतर बँकिंग संकटांशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे बायडेन यांना विचारण्यात आली होती. बायडेन यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. 

बायडेन यांच्या अशा वागण्यावर सोशल मीडियामध्ये टीकेची झोड उठली आहे. लवचीक बँकिंग व्यवस्था राखण्याची आणि ऐतिहासिक आर्थिक सुधारणेसाठी पावले उचलण्याची गरज आहे असे सांगून बायडेन पत्रकार परिषद संपवत असतानाच हा प्रकार घडला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: issue of sinking banks was taken up and president joe biden left