हमासने डागलेल्या क्षेपणास्त्रांना इस्रायलचं चोख प्रत्युत्तर; १,००० बॉम्ब हवेतच परतवून लावले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:50 AM2021-05-13T06:50:47+5:302021-05-13T06:52:59+5:30

राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज या दोन इस्रायली कंपन्यांनी अमेरिकेच्या मदतीने ही सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे

Israel's response to Hamas missiles; 1,000 bombs dropped in the air | हमासने डागलेल्या क्षेपणास्त्रांना इस्रायलचं चोख प्रत्युत्तर; १,००० बॉम्ब हवेतच परतवून लावले...

हमासने डागलेल्या क्षेपणास्त्रांना इस्रायलचं चोख प्रत्युत्तर; १,००० बॉम्ब हवेतच परतवून लावले...

Next

इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हमास या पॅलेस्टाइनमधील राजकीयदृष्ट्या प्रबळ असलेल्या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्याला इस्रायलनेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. परंतु इस्रायलच्या दिशेने डागलेल्या क्षेपणास्त्रांचा हवेतल्या हवेतच खात्मा केला जात आहे. त्यासाठी इस्रायलने आपल्याभोवती निर्माण केलेले आयर्न डोम हे सुरक्षा कवच परिणामी ठरत आहे. जाणून घेऊ या तंत्रज्ञानासंबंधी...

इस्रायलची आयर्न डोम यंत्रणा काय आहे? -
- शत्रू राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी ही यंत्रणा आहे.
- राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज या दोन इस्रायली कंपन्यांनी अमेरिकेच्या मदतीने ही सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे
- इस्रायलच्या दिशेने येणारी क्षेपणास्त्रे, तोफगोळे आणि छोटे रॉकेट्सर्स आयर्न डोम तंत्रज्ञानाच्या साह्याने हवेतल्या हवेतच नष्ट केली जातात.
- हवाई हल्ल्यांपासून आपल्या शहरांचे, नागरिकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने इस्रायलने २०११ मध्ये आयर्न डोम यंत्रणेचा सुरक्षा दलांमध्ये समावेश केला
- फक्त शहराच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्रांनाच नष्ट करण्यासाठी इस्रायल ही यंत्रणा वापरतो

बेटल मॅनॅजमेन्ट कंट्रोल सिस्टिम  - 
धोका असल्याचे समजताच क्षेपणास्त्र वा रॉकेट हवेतल्या हवेत नष्ट करण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित होते. 

२००६ मध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला ही लेबनॉनची दहशतवादी संघटना यांच्यात घनघोर युद्ध झाले. तेव्हा इस्रायलवर तब्बल ४ हजार रॉकेट्सचा मारा झाला होता. त्यात ४४ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. तेव्हापासून हवाई हल्ल्यांपासून स्वत:च्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचा निर्धार इस्रायलने केला.

आयर्न डोमच्या देखभालीसाठी अमेरिकेने इस्रायलला ४२९ दशलक्ष डॉलरची मदत केली आहे. पॅलेस्टाइनविरोधातील ताज्या संघर्षात या यंत्रणेने आतापर्यंत १००० बॉम्बना हवेतच नष्ट केल्याचे सांगितले जाते.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Israel's response to Hamas missiles; 1,000 bombs dropped in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app