शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

बुशहर अणुभट्टीवर इस्रायली हल्ला! रशियाची मोठी माघार; रशियन तज्ज्ञांचे तातडीने स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 10:50 IST

इराणमधील बुशहर अणुऊर्जा प्रकल्पावर इस्रायलने हल्ला केल्यानंतर रशियाने आपल्या वैज्ञानिकांना बाहेर काढले आहे.

मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धाने आता अत्यंत भयानक वळण घेतले आहे. इराणमधील बुशहर अणुऊर्जा प्रकल्पावर इस्रायलने केलेल्या ताज्या हल्ल्यानंतर रशियाने मोठे पाऊल उचलले आहे. बुशहरमधील परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली असून, रशियाने तेथे कार्यरत असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना आणि वैज्ञानिकांना तातडीने बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. रशियाची सरकारी अणुसंस्था 'रोसाटॉम'चे प्रमुख अलेक्सी लिखाचेव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची भीती व्यक्त केली आहे.

रिअॅक्टरच्या अगदी जवळ पडले क्षेपणास्त्र

मंगळवारी संध्याकाळी एक क्षेपणास्त्र बुशहर प्रकल्पातील सक्रिय रिअॅक्टर युनिटच्या अगदी जवळ येऊन पडले. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा अणुभट्टीचे मोठे नुकसान झाले नाही. मात्र, १८०°C पेक्षा जास्त उष्णता आणि रेडिएशनचा धोका असलेल्या या परिसरात अशा प्रकारचा हल्ला होणे म्हणजे मोठ्या जागतिक संकटाला निमंत्रण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी १७ मार्च रोजीही असाच एक प्रयत्न झाला होता.

रशियन नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू

अलेक्सी लिखाचेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी तीन टप्प्यांची योजना आखली आहे. आज सकाळी रशियन कर्मचाऱ्यांचा पहिला गट रस्तेमार्गे इराण-आर्मेनिया सीमेकडे रवाना झाला आहे. लवकरच आणखी दोन गट इथून बाहेर काढले जातील. जोपर्यंत इराणमधील परिस्थिती शांत होत नाही, तोपर्यंत या प्लांटमध्ये केवळ नावापुरतेच रशियन तज्ज्ञ उपस्थित राहतील.

इराणमध्ये रक्ताचा सडा

गेल्या २८ फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ल्यांचा मोठा धडाका लावला आहे. या भीषण युद्धात आतापर्यंत १,३४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. इराणनेही याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल, जॉर्डन आणि इराकमधील अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे.

जागतिक बाजारपेठेवर युद्धाचे सावट

या युद्धामुळे जागतिक बाजारपेठ कोसळली असून विमान वाहतूक सेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे महासंचालक राफेल ग्रॉसी यांच्याशी रशियाने चर्चा केली असून, अणू प्रकल्पाला धोका निर्माण झाल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील, असा इशारा रशियाने दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Israeli strike on Bushehr nuclear plant; Russia withdraws experts.

Web Summary : After an alleged Israeli strike near Iran's Bushehr nuclear plant, Russia evacuated its staff. Tensions escalate as a missile landed close to the reactor. Iran's leader reportedly died in attacks, prompting retaliatory strikes. Global markets face turmoil.
टॅग्स :russiaरशियाUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर