इस्रायली सैन्याने शेकडो मगरींना गोळ्या घालून मारले; कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:26 IST2025-08-12T12:25:31+5:302025-08-12T12:26:37+5:30

Israel News: पर्यावरणवाद्यांनी इस्रायलच्या या कृतीवर तीव्र शब्दात टीका केली.

Israeli army shot and killed hundreds of crocodiles; why? | इस्रायली सैन्याने शेकडो मगरींना गोळ्या घालून मारले; कारण काय..?

इस्रायली सैन्याने शेकडो मगरींना गोळ्या घालून मारले; कारण काय..?

Israel News: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सैन्याने वेस्ट बँक भागात २६२ मगरींना गोळ्या घालून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पर्यावरणवाद्यांनी इस्रायलच्या या कृतीवर तीव्र शब्दात टीका केली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायली सैन्याने व्यापलेल्या वेस्ट बँकमधील बेकायदेशीर वस्ती असलेल्या पेटझेलजवळील एका क्रोकोडायल फार्ममध्ये २६२ मगरींना गोळ्या घालून मारले. सैन्याने आधी तलावाचे पाणी काढून टाकले, नंतर शेकडो मगरींना गोळ्या घातल्या. हा परिसर एकेकाळी लोकप्रिय पर्यटन स्थळ होते. येथे मगरींच्या कातड्याचा व्यवसायदेखील व्हायचा. २००० च्या दशकात येथे सुमारे ३,००० मगरी आणण्यात आल्या होत्या.

हत्येमागील कारण काय आहे?
इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे की, या फार्मची योग्य देखभाल केली जात नव्हती, त्यामुळे मगरी स्थानिक नागरिकांसाठी धोकादायक ठरत होत्या. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मगरी वाईट परिस्थितीत राहत आहेत. अन्नाअभावी त्या एकमेकांवरही हल्ला करतात. २०१३ पासून इस्रायलमध्ये नाईल मगरींना संरक्षित प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले आहे. तरीदेखील सैन्याने या मगरींना गोळ्या घालून ठार मारले. 

फार्म मालकाचा सैन्यावर आरोप  
फार्मचा मालक बिटनने या परिसराला संरक्षण देण्यास नकार दिला होता. २०१३ मध्ये नाईल मगरीला संरक्षित प्रजाती म्हणून घोषित करण्यापूर्वी बिटन पैशासाठी मगरींचा व्यापार करायचा. मात्र, कायदा बदलल्यानंतर बिटनचा पैसे कमावण्याचा मार्ग बंद झाला. तेव्हापासून त्याने मगरींकडे दुर्लक्ष सुरू केले. स्थानिक प्रशासनाने मदत न केल्याचा दावा बिटनने केला आहे. तो म्हणतो की, मगरींना इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र त्यापूर्वीच प्रशासनाने शेतात घुसून मगरींना मारले.

Web Title: Israeli army shot and killed hundreds of crocodiles; why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.