इराण-लेबनॉनचा काळ बनून इस्रायल तुटून पडणार! ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 08:27 IST2026-03-24T08:24:41+5:302026-03-24T08:27:30+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अधिकच आक्रमक झाले आहेत.

Israel will fall apart in the era of Iran-Lebanon! Netanyahu's big announcement after talks with Trump | इराण-लेबनॉनचा काळ बनून इस्रायल तुटून पडणार! ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंची मोठी घोषणा

इराण-लेबनॉनचा काळ बनून इस्रायल तुटून पडणार! ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंची मोठी घोषणा

मध्यपूर्वेतील युद्धाची धग कमी होण्याची चिन्हे असतानाच आता एका मोठ्या घडामोडीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अधिकच आक्रमक झाले आहेत. "आम्ही इराण आणि लेबनॉनवरील हल्ले थांबवणार नाही, तर ते अधिक तीव्र करू," अशी गर्जना नेतन्याहू यांनी केली आहे. विशेष म्हणजे, इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला सुरुंग लावण्यासाठी इस्रायलने अलीकडेच दोन मोठ्या अण्वस्त्र शास्त्रज्ञांना यमसदनी धाडल्याचा खळबळजनक खुलासाही त्यांनी केला आहे.

ट्रम्प यांच्याशी काय झाली चर्चा?

पंतप्रधान नेतन्याहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या संवादाची माहिती दिली. ते म्हणाले की, "माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. ट्रम्प यांचे स्पष्ट मत आहे की, अमेरिकन आणि इस्रायली सैन्याने आतापर्यंत मिळवलेल्या लष्करी यशाचा वापर एका अशा करारासाठी केला पाहिजे, ज्यामुळे इस्रायलच्या हिताचे रक्षण होईल." या विधानातून नेतन्याहू यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, जोपर्यंत इराण गुडघे टेकणार नाही, तोपर्यंत युद्धविराम होणे कठीण आहे.

अण्वस्त्र प्रकल्पावर थेट निशाणा

नेतन्याहू यांनी इराणला इशारा देताना सांगितले की, "आम्ही केवळ हल्लेच करत नाही आहोत, तर इराणचा मिसाईल कार्यक्रम आणि अण्वस्त्र स्वप्न अक्षरशः चिरडून टाकत आहोत. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या अड्ड्यांवर आमचे हल्ले सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वीच आम्ही इराणच्या दोन महत्त्वाच्या अण्वस्त्र शास्त्रज्ञांना संपवले आहे. आमचे हात अजूनही लांब आहेत आणि आम्ही आमच्या शत्रूचा पाठलाग सोडणार नाही."

ट्रम्प यांचा 'होर्मुज' इशारा

दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी एका अज्ञात इराणी अधिकाऱ्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या चर्चेत त्यांनी इराणला निर्वाणीचा इशाराही दिला आहे. होर्मुजची सामुद्रधुनी ही महत्त्वाची सागरी व्यापार मार्गिका पुन्हा सुरू करा, अन्यथा अमेरिकन लष्कराकडून इराणचे पॉवर प्लांट्स उद्ध्वस्त होताना पाहा, अशा कडक शब्दात ट्रम्प यांनी इराणला सुनावले आहे.

युद्धविरामाच्या चर्चांना पूर्णविराम?

सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविराम होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, नेतन्याहू यांच्या या ताज्या विधानाने या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे इस्रायल आता अधिक आत्मविश्वासाने इराणच्या अण्वस्त्र तळांना लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title : ट्रम्प से चर्चा के बाद ईरान, लेबनान पर इजरायल के हमले तेज!

Web Summary : ट्रम्प से बात के बाद नेतन्याहू ने ईरान और लेबनान पर हमले तेज करने का ऐलान किया। ईरान के परमाणु कार्यक्रम को खत्म करने का लक्ष्य। परमाणु वैज्ञानिकों को मारने की पुष्टि, युद्धविराम की चर्चा खारिज।

Web Title : Israel to intensify attacks on Iran, Lebanon after Trump talks.

Web Summary : Netanyahu, after talking with Trump, declared intensified attacks on Iran and Lebanon, aiming to dismantle Iran's nuclear program. He confirmed eliminating Iranian nuclear scientists and warned of continued pursuit of enemies, dismissing ceasefire talks.