अमेरिका आणि इस्रायलनेइराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्र डागून मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इराणमध्ये सर्वत्र विनाशाचं दृश्य पाहायला मिळत आहे. इराणमधील भयंकर परिस्थिती पाहून अभिनेत्री मंदाना करीमी अत्यंत अस्वस्थ आणि दुःखी झाली आहे. ढसाढसा रडत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मंदाना करीमी मूळची इराणची राजधानी तेहरानची आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती भारतात राहत आहे. आता इराणमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे तिथल्या लोकांच्या सुरक्षेबाबत ती चिंतेत आहे. मंदानाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या मातृभाषेत बोलतानाही दिसत आहे.
मंदानाचं दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत आहे. तिने व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "खूप जास्त वेदना होत आहेत, पण खूप मोठी आशा देखील आहे. कदाचित आता 'नौरोज़' (इराणी नवीन वर्ष) वेगळं असेल. इराणसाठी प्रार्थना करा."
अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूची बातमीही समोर आली आहे. यानंतर इराणमधून असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक आनंद साजरा करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मंदाना करीमीने तिच्या एका स्टोरीमध्ये इराणी लोकांच्या या आनंदामागचं कारण सांगितलं आहे.
"अविश्वसनीय! आम्ही गेली ४७ वर्षे... "; खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
"अनेकदा लोक युद्धामुळे आनंदी नसतात, तर ते जीव गुदमरवून टाकणाऱ्या परिस्थितीचा शेवट होत असल्यामुळे आनंदी असतात. जेव्हा तुम्ही अनेक वर्षे दबावाखाली जगता आणि तुमची स्वप्नं हळूहळू संपू लागतात, तेव्हा तुम्ही रोज सकाळी चिंतेने ग्रासलेले असता. अनेक लोक या युद्धाकडे 'मुक्ती' म्हणून पाहत आहेत. त्यांना विनाश आवडतो म्हणून नाही, तर त्यांना असं वाटतं की आता त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलेलं नाही" असं म्हटलं आहे.
इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा; खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे सत्ता
"आता तर खूप भीती वाटतेय, याचा अंत नाही", ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतून एका आईचा मेसेज व्हायरल
मंदाना करीमी गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहत आहे. मॉडेल म्हणून तिने करिअरची सुरुवात केली होती. अभिनेत्रीने 'भाग जॉनी', 'क्या कूल हैं हम' यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय ती सलमान खानच्या 'बिग बॉस' आणि एकता कपूरच्या 'लॉक अप' या शोमध्येही दिसली होती.
Web Summary : Following attacks on Iran, actress Mandana Karimi, originally from Tehran, expressed her distress. She shared a tearful video, highlighting the fear and hope amidst the conflict, stating people feel they have nothing left to lose.
Web Summary : ईरान पर हमलों के बाद, तेहरान की मूल निवासी अभिनेत्री मंदाना करीमी ने अपनी व्यथा व्यक्त की। उन्होंने एक भावुक वीडियो साझा किया, जिसमें संघर्ष के बीच डर और आशा को उजागर किया गया, जिसमें कहा गया कि लोगों को लगता है कि उनके पास खोने के लिए कुछ नहीं बचा है।