हमासच्या हल्ल्याचा इस्राइलने घेतला भयंकर सूड, १५०० दहशतवाद्यांना केलं ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 13:46 IST2023-10-10T13:45:18+5:302023-10-10T13:46:03+5:30
Israel-Hamas war: हमासने इस्लाइलवर केलेल्या हल्ल्याचा इस्राइलकडून भयंकर सूड घेतला जात आहे. इस्राइलच्या सैन्याकडून गाझापट्टीवर सातत्याने बॉम्बफेक केली जात आहे. त्यामुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

हमासच्या हल्ल्याचा इस्राइलने घेतला भयंकर सूड, १५०० दहशतवाद्यांना केलं ठार
हमासने इस्लाइलवर केलेल्या हल्ल्याचा इस्राइलकडून भयंकर सूड घेतला जात आहे. इस्राइलच्या सैन्याकडून गाझापट्टीवर सातत्याने बॉम्बफेक केली जात आहे. त्यामुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. इस्राइली सैन्याने हमासचे ४७५ रॉकेट सिस्टिम आणि ७३ कमांड सेंटर उद्ध्वस्तकेले आहेत. तसेच इस्राइलच्या हद्दीत घुसलेल्या हमासच्या १५०० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून, त्यांचे मृतदेह इतरत्र पडले आहेत, असा दावा इस्राइलमधील स्थानिक माध्यमांनी केला आहे.
इस्राइलमधील १३ न्यूज या वृत्तवाहिनीने सांगितले की, इस्राइली क्षेत्रामध्ये पॅलेस्टाइनी दहशतवाद्यांचे सुमारे १५०० मृतदेह विखुरलेले आहेत. इस्राइलच्या सुरक्षा दलांनी घुसखोरी करणाऱ्या हमास आणि पॅलेस्टाइनच्या शेकडो इस्लामिक जिहादी दहशतवाद्यांना ठार केले आहे.
त्याशिवाय इस्राइलने २३ अशा इमारतींवरही हल्ला केला आहे. ज्यांचा वापर हमासचे दहशतवादी करत होते. त्याशिवाय हमासच्या २२ अंडरग्राऊंड तळानांही उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. पॅलेस्टाइनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गाझामध्ये इस्राइली बॉम्बस्फोटामध्ये ७०४ पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. त्यात १४३ मुले आणि १०५ महिलांचा समावेश आहे. तर ४ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.