इस्त्रायल हजारो सैनिकांना गाझातून माघारी बोलविणार; सैन्य अन् हमासमध्ये भीषण संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 12:26 PM2024-01-01T12:26:26+5:302024-01-01T12:26:43+5:30

गाझामध्ये अधिक शक्तीशाली आक्रमण करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून गाजामध्ये घुसलेल्या सैनिकांना माघारी बोलविण्यात येणार आहे.

Israel to withdraw thousands of soldiers from Gaza; Fierce conflict between the army and Hamas | इस्त्रायल हजारो सैनिकांना गाझातून माघारी बोलविणार; सैन्य अन् हमासमध्ये भीषण संघर्ष

इस्त्रायल हजारो सैनिकांना गाझातून माघारी बोलविणार; सैन्य अन् हमासमध्ये भीषण संघर्ष

इस्त्रायली सैन्याने गाझामध्ये एकीकडे कारवाई तीव्र केलेली असताना गाझात तैनात सैन्यातील हजारो सैनिकांना माघारी बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. आयडीएफने रविवारी ही घोषणा केली आहे. गाझामध्ये जमिनीवर लढणाऱ्या पाच ब्रिगेड माघारी बोलविण्यात येणार आहे. हे सैन्य राखीव सैनिकांचे असणार आहे. 

गाझामध्ये अधिक शक्तीशाली आक्रमण करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून गाजामध्ये घुसलेल्या सैनिकांना माघारी बोलविण्यात येणार आहे. त्यांच्या जागी नवीन राखीव सैनिक पाठविण्यात येणार आहेत. यादरम्यान गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत इस्त्रायली सैन्याच्या हल्ल्यांत १५० फिलिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. तसेच २८६ लोक जखमी झाल्याचे म्हटले आहे. 

आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की काही राखीव सैनिक या आठवड्यात लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबात आणि नोकरीवर परततील. यामुळे अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण दिलासा मिळेल आणि नवीन वर्षात सुरू होणाऱ्या गोष्टींपूर्वी ताकद एकत्रित करण्यास मदत मिळेल. गाझामधील हमासचे बोगदे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. गाझामधून इस्रायलच्या दिशेने डागलेल्या रॉकेटची तीव्रता कमी करण्यासाठीही काम केले जात आहे.

इस्रायलने मध्य गाझावर हल्ले तीव्र केले आहेत. रात्रभर अल-मगाझी आणि अल-बुरेज सारख्या शहरांवर हवाई हल्ले झाले. रेड क्रिसेंटने रविवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इस्रायली हल्ल्यानंतर अफरातफरीचे वातावरण दिसत आहे. गाझा शहरात इस्रायली सैन्य आणि हमासच्या दराज तुफाह बटालियनमध्ये भीषण संघर्ष झाल्याचे वृत्त आहे.

Web Title: Israel to withdraw thousands of soldiers from Gaza; Fierce conflict between the army and Hamas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.