इस्राइलकडून मोठी कारवाई, हमास-गाझा ब्रिगेडच्या दोन कमांडरांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 09:46 IST2026-02-05T09:45:33+5:302026-02-05T09:46:11+5:30

Israel Air Strike: स्राइल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) आणि इस्राइली सुरक्षा एजन्सी (आयएसए) यांनी संयुक्त अभियान राबवत हमासचा कमांडर मोहम्मद अल-हबीब आणि इस्लामिक जिहादचे अली राजियाना या कमांडरांना कंठस्नान घातले आहे.

Israel takes major action, kills two Hamas-Gaza Brigade commanders | इस्राइलकडून मोठी कारवाई, हमास-गाझा ब्रिगेडच्या दोन कमांडरांचा केला खात्मा

इस्राइलकडून मोठी कारवाई, हमास-गाझा ब्रिगेडच्या दोन कमांडरांचा केला खात्मा

गाझामध्ये युद्धविराम झाला असला तरी हमास आणि इस्राइलच्या सैन्यामध्ये अधूनमधून चकमकी घडत आहेत. दरम्यान, इस्राइल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) आणि इस्राइली सुरक्षा एजन्सी (आयएसए) यांनी संयुक्त अभियान राबवत हमासचा कमांडर मोहम्मद अल-हबीब आणि इस्लामिक जिहादचे अली राजियाना या कमांडरांना कंठस्नान घातले आहे. अल-हबीब याच्यावर इस्राइली कॉर्पोरल नोआ मार्सियानो हिची निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप होता. तर तर अली राजियाना हा उत्तर गाझा ब्रिगेडमधील इस्लामिक जिहादचा मुख्य कमांडर होता.

आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार ही एअर स्ट्राईक युद्धविरामाच्या उल्लंघनाचं प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली आहे. नोआ मार्सियानो हिचं ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यादरम्यान नाहल ओज पोस्टवरून अपहरण करण्यात आलं होतं. ती इस्राइली सैन्यामध्ये एक ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्त होती. दरम्यान, हमासच्या कैदेत असताना तिची हत्या झाल्याचं वृत्त आल्याने इस्राइलमध्ये संतापाची लाट पसरली होती.

दरम्यान, इस्राइली लष्कराने या दोन कमांडरचा खात्मा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या कारवाईमुळे मार्सियोनो हिच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे, असेही या संदर्भात समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये इस्राइलच्या लष्कराने म्हटले आहे. तसेच इस्राइलचे नागरिक आणि सैनिकांविरोधात हिंसक कृत्य करणाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार इस्राइलच्या सैन्यदलांकडून ही एअरस्ट्राईक इस्राइल आणि इस्राइलच्या नागरिकांविरोधातील हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करून करण्यात आली होती. या हल्ल्यात राजियाना याचं मारलं जाणं हे इस्लामिक जिहादसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.  

Web Title : इजराइल ने हमास, इस्लामिक जिहाद के कमांडरों को मार गिराया।

Web Summary : इजराइल ने हमास कमांडर मोहम्मद अल-हबीब, जिन पर इजरायली सैनिक नोआ मार्सियानो की हत्या का आरोप है, और इस्लामिक जिहाद कमांडर अली राजियाना को गाजा में मार गिराया। यह हमला युद्धविराम उल्लंघन का बदला था और इजरायलियों पर हमला करने वालों को निशाना बनाया गया था।

Web Title : Israel eliminates Hamas, Islamic Jihad commanders in retaliatory strike.

Web Summary : Israel killed Hamas commander Mohammed al-Habib, accused of murdering Israeli soldier Noa Marciano, and Islamic Jihad commander Ali Rajiana in Gaza. The strike retaliated for ceasefire violations and aimed at those attacking Israelis.