शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Israel-Palestine Crisis: इस्रायलचे PM नेतन्याहू यांच्यावर देशांतर्गत तीव्र नाराजी; हमाससमोर गुडघे टेकल्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 3:25 PM

Israel-Palestine Crisis: नेतन्याहू यांच्याविरोधात देशांतर्गत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, हमाससमोर गुडघे टेकल्याची टीका करण्यात येत आहे.

ठळक मुद्देबेंजामिन नेतन्याहू यांच्यावर जनेतची तीव्र नाराजीहमाससमोर गुडघे टेकल्याची टीका११ दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर शस्त्रसंधीची तयारी

तेल अवीव: गेल्या ११ दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये तीव्र संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळाले. हमासविरोधात इस्रायलने कारवाई करत चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, आता यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शस्त्रसंधीसाठी तयार असल्याची घोषणा केली. यानंतर पॅलेस्टाइनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी जल्लोष केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, नेतन्याहू यांच्याविरोधात देशांतर्गत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, हमाससमोर गुडघे टेकल्याची टीका करण्यात येत आहे. (israel right wing criticises pm benjamin netanyahu for ceasefire with hamas palestine conflict)

पंतप्रधान नेतन्याहू यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने गाझा पट्टीमधील ११ दिवसांची लष्करी कारवाई थांबवण्यासाठी शस्त्रसंधीला मंजुरी दिली. नेतन्याहू यांनी गाझामध्ये सुरू असलेली लष्करी कारवाईसह इतर देशांकडून शस्त्रसंधीसाठी सुरू असलेल्या दबावाच्या मुद्यावर सुरक्षा कॅबिनेटची बैठक बोलावली होती. त्यावेळी कॅबिनेट मंत्र्यांनी शस्त्रसंधीच्या बाजूने मतदान केले.

नेतन्याहू सरकारवर टीका

'न्यू होप'चे नेते गिदोन सार यांनी कॅबिनेटमधील निर्णयाच्या आधी नेतन्याहू सरकारवर टीका केली. शस्त्रसंधीनंतर हमास आणि इतर दहशतवादी गटांविरोधात सुरू असलेल्या इस्रायलच्या मोहिमेला गंभीर नुकसान होईल, असे त्यांनी म्हटले. हमासला आणखी मजबूत होण्यापासून रोखणे, गाझामध्ये अटक करण्यात आलेले इस्रायली सैनिकांची आणि नागरिकांच्या सुटकेशिवाय ही शस्त्रसंधी म्हणजे मोठे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले.

Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!

हमास आता इस्रायलला धमकी देण्याच्या स्थितीत

उजव्या विचारांचे नेते आणि एविग्डोर लिबरमॅनचे अध्यक्ष इज्रियल बीटेनु सेजफायर यांनी नेतन्याहू सरकारचे आणखी एक अपयश असल्याचे म्हटले. दहशतवादी गटांबाबत मागील सरकारने नरमाईची भूमिका घेतली होती. त्यामुळे हमास आता इस्रायलला धमकी देण्याच्या स्थितीत आला आहे. नेतन्याहू यांनी हमासला अधिक मजबूत केले असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, नेतन्याहू यांच्यावर त्यांच्याच पक्षातून टीका सुरू झाली आहे. लिकुड पक्षाचे नेते आणि उपसंरक्षण मंत्री गॅडी येवरकन यांनी म्हटले की, २०१४ मध्ये हमासने ताब्यात घेतलेल्या इस्रायली सैन्यांचे मृतदेह आणि दोन इस्रायली नागरिकांच्या सुटकेशिवाय शस्त्रसंधी करणे हे दहशतवादाला पुरस्कार देण्यासारखे असल्याची टीका येवरकन यांनी केली. 

टॅग्स :Israelइस्रायलGaza Attackगाझा अटॅकBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू