Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 12:56 PM2021-05-20T12:56:17+5:302021-05-20T12:58:38+5:30

Corona Vaccine: नागरिकांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी या देशाने तब्बल २० हजार कोरोना लसीचे डोस जाळल्याची माहिती मिळाली आहे.

malawi burns nearly 20k expired astraZeneca corona vaccine shots | Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!

Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!

Next
ठळक मुद्देCorona Vaccine वर नागरिकांची शंकाअफ्रिकन देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!या देशात ३ लाख नागरिकांचे लसीकरण

लिलोंग्वा: कोरोनाचा कहर जागतिक पातळीवर अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक लहान देशांमध्ये अद्यापही कोरोना लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. जागतिक स्तरावरील बहुतांश देशात कोरोनावरील नियंत्रणासाठी लसीकरण केले जात आहे. मात्र, आफ्रिकेतील एका देशातून वेगळाच प्रकार समोर आला आहे. देशातील नागरिकांनी कोरोना लसींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे नागरिकांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी या देशाने तब्बल २० हजार कोरोना लसीचे डोस जाळल्याची माहिती मिळाली आहे. (malawi burns nearly 20k expired astraZeneca corona vaccine shots)

या अफ्रिकन देशाचे नाव मलावी असून, या देशात जाळण्यात आलेले सर्व कोरोना लसीचे डोस एस्ट्राजेनका कंपनीचे होते. या लसींची मुदत संपली होती. नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी या लसींचे डोस जाळण्यात आले. मुदत संपलेल्या लसी जाळणारा मलावी हा पहिला आफ्रिकन देश असल्याचे सांगितले जात आहे. 

पंतप्रधान मोदी अविरतपणे जनतेची सेवा करतायत, तर काँग्रेस संभ्रम पसरवतेय: जेपी नड्डा

नागरिकांमध्ये लसींबाबत शंका

मलावीमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात मुदत संपलेल्या लशीचे डोस नष्ट करण्यात आले. नागरिकांमध्ये लसींबाबत शंका होती. अशातच मुदत संपलेल्या लसीचे डोस देण्यात येत असल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये पसरला होता. हा गैरसमज दूर करण्यासाठी लसीचे २० हजार डोस जाळण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

“जनतेला पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये भविष्य दिसत नाही”; मनसेची टीका

मलावीमध्ये ३ लाख नागरिकांचे लसीकरण

मलावी देशाला कोवॅक्सिन शेअरिंग फॅसिलिटी अंतर्गत तीन लाख डोस, भारताकडून ५० हजार आणि आफ्रिकन संघाकडून १.०२ लाख डोस देण्यात आले होते. मलावी देशातील अनेक भागांमध्ये लस घेण्यासाठी नागरिक केंद्रावर गेलेच नाहीत. त्यामुळे लसींचे हजारो डोस वाया गेल्याचे सांगितले जात आहे. एस्ट्राजेनका लसीच्या विरोधात मोहीम राबवली गेली. त्यामुळेच लसीचा वापर वापर झाला नाही, असे म्हटले जात आहे.  

चीनकडून काही अपेक्षा नाही! नेपाळमध्ये ऑक्सिजन तुटवडा; भारताला मदतीचे साकडे

दरम्यान, मलावीमध्ये वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील किमान ६० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य होते. मार्च महिन्यात लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत ३ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे.
 

Web Title: malawi burns nearly 20k expired astraZeneca corona vaccine shots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.