इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 10:59 IST2025-12-21T10:59:02+5:302025-12-21T10:59:43+5:30
इराणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मिसाइल प्रोग्रामच्या पार्श्वभूमीवर इराणवर हल्ला व्हावा, अशी खुद्द डोनाल्ट ट्रम्प यांचीही इच्छा आहे...

इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
इराणच्या बॅलिस्टिक मिसाइल प्रोग्राममुळे अस्वस्थ झालेला इस्रायल आता पुन्हा एकदा त्याच्यावर स्ट्राइक करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. 29 डिसेंबरला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांची भेट घणार आहेत. यावेळी ते ट्रम्प यांना पुढील योजनेसंदर्भात सविस्तर माहिती देऊ शकतात.
इराणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मिसाइल प्रोग्रामच्या पार्श्वभूमीवर इराणवर हल्ला व्हावा, अशी खुद्द डोनाल्ट ट्रम्प यांचीही इच्छा आहे. इस्रायलने यापूर्वीही अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात चर्चा केली आहे. महत्वाचे म्हणजे, यापूर्वीही इराण-इस्रायल संघर्ष झाला होता. यानंतर अमेरिकेनेही इराणच्या अणु ठिकाणांवर बॉम्बिंग केली होती.
यासंदर्भात बोलताना आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) महासंचालक राफेल ग्रोसी म्हणाले, "संघटना इराणच्या सर्वात संवेदनशील अणुस्थळांपर्यंत पोहोचू शकली नाही." मात्र, "त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्प आणि शास्त्रज्ञांच्या सुरक्षिततेसंदर्भातील चिंतेमुळे आपण IAEA वर विश्वास ठेऊ शकत नाही असे इराणने म्हटले आहे.
रशिय वृत्त संस्था रिया नोवोस्तीने ग्रॉसी यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, "अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर, निरीक्षक काही अणुस्थळांपर्यंत गेले होते. मात्र, अमेरिकेच्या हल्ल्यात ज्या अणुस्थळांचे नुकसान झाले होते, तिथवर ते अद्यापही पोहोचू शकलेले नाहीत."
संबंधित वृत्तानुसार, "आम्हाला केवळ, जेथे हल्ला झाला नाही, अशाच ठिकाणांवर जाऊ दिले. नतांज, इस्फाहन आणि फोर्डोंपर्यंत पोहोचणे अधिक महत्वाचे आहे. कारण याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अणु साहित्य आणि उपकरणे आहेत, अेसही ग्रॉसी यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, जून २०२५ मध्ये इस्रायल आणि इराणमधील तणाव प्रचंड शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्लेही केले होते. इस्रायलने इराणवर गुप्त अणुकार्यक्रम चालवल्याचा आरोप केला, मात्र तो आरोप इराणने नाकारला होता. इस्रायलने १३ जून रोजी इराणच्या अणु आणि लष्करी ठिकाणांवर हल्ला केला होता. यानंतर, २२ जूनला, अमेरिकेनेही इराणच्या नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो अणुस्थळांवर हवाई हल्ले केले होते.