इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 05:53 IST2025-07-21T05:52:56+5:302025-07-21T05:53:25+5:30
गाझामध्ये विविध ठिकाणी मदत सामग्रीची प्रतीक्षा करणारे ७३ जण गोळीबारात ठार झाले, अशी माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.

इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
दीर अल बलाह : गाझामध्ये विविध ठिकाणी मदत सामग्रीची प्रतीक्षा करणारे ७३ जण गोळीबारात ठार झाले, अशी माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. सर्वाधिक मृत्यू उत्तर गाझामध्ये झाले. या ठिकाणी इस्रायलला लागून असलेल्या जिकिम सीमेतून येणाऱ्या मदतीची लोक वाट पाहत होते. या ठिकाणी ६७ जण ठार झाले व १५० जण जखमी झाले. यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. हा प्रकार इस्रायल सैन्याच्या गोळीबारामुळे झाला की सशस्त्र टोळ्यांच्या हल्ल्यात घडला, हे स्पष्ट झालेले नाही.
उत्तर गाझामध्ये हा गोळीबार गाझा मानवतावादी निधीशी संबंधित मदत वितरण केंद्रांजवळ झालेला नाही. जीएचएफ अमेरिकी व इस्रायल समर्थित समूह आहे, जो पॅलेस्टिनींना खाद्य सामग्री वितरित करतो. प्रत्यक्षदर्शी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले की, समूहाच्या वितरण केंद्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना आजवर शेकडो लोक इस्रायली गोळीबारात ठार झाले आहेत.
दरम्यान, इस्रायली सैन्याने रविवारी मध्य गाझाच्या भागांमध्ये नव्याने इशारा जारी केला आहे. इस्रायल व हमास कतारमध्ये युद्धबंदीबाबत चर्चा करीत असताना हा इशारा जारी करण्यात आला आहे. परंतु आंतरराष्ट्रीय मध्यस्थांचे म्हणणे आहे की, यात कोणतेही यश मिळाले नाही.
टक्क्यांहून अधिक भागावर नियंत्रण
या महिन्याच्या सुरुवातीस इस्रायली सैन्याने म्हटले होते की, गाझापट्टीच्या ६५ टक्क्यांहून अधिक भागावर त्यांचे नियंत्रण आहे. गाझाचा जो भाग रिकामा करण्याचा आदेश देण्यात
आला आहे, तेथे अनेक आंतरराष्ट्रीय संघटना आहेत व त्या मदत सामग्री वितरित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.