लेबनॉनमध्ये इस्रायलचं ऑपरेशन अयशस्वी; इस्रायली कमांडोंना भिडले हिजबुल्लाहचे सैनिक, ४१ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 14:51 IST2026-03-08T14:50:51+5:302026-03-08T14:51:12+5:30

इस्रायली सैनिक आणि हिजबुल्लाहच्या जवानांमध्ये चकमक झाली. याठिकाणी सतत स्फोट सुरू होते. त्यात स्फोटामुळे एक कार हवेत उडाली

Israel operation in Lebanon fails; Hezbollah soldiers clash with Israeli commandos, 41 dead | लेबनॉनमध्ये इस्रायलचं ऑपरेशन अयशस्वी; इस्रायली कमांडोंना भिडले हिजबुल्लाहचे सैनिक, ४१ मृत्यू

लेबनॉनमध्ये इस्रायलचं ऑपरेशन अयशस्वी; इस्रायली कमांडोंना भिडले हिजबुल्लाहचे सैनिक, ४१ मृत्यू

पूर्व लेबनॉनमध्ये इस्रायलच्या स्पेशल फोर्सच्या एक सैन्य कारवाईत कमीत कमी ४१ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० हून अधिक जखमी आहेत. बेका व्हॅलीमधील नबी शीत शहरात इस्रायलच्या स्पेशल फोर्सनं ऑपरेशन केले होते. 

माहितीनुसार, इस्रायली कमांडो ऑपरेशनचा उद्देश १९८६ पासून बेपत्ता असलेले इस्रायली हवाई दलाचे अधिकारी रॉन अराद यांचे अवशेष शोधणे होते. रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये हवाई हल्ले आणि जमिनीवरील कारवाईचा समावेश होता. या हल्ल्यांमुळे परिसरातील अनेक इमारतींचे नुकसान झाले, छत उडून गेले आणि जमिनीवर मोठे खड्डे तयार झाले. यावेळी स्फोटांचा आवाज इतका प्रचंड होता की एखाद्या सिनेमासारखे इथले दृश्य झाले होते असं स्थानिक प्रत्यक्षदर्शी रहिवासी मोहम्मद मूसा यांनी सांगितले.

इस्रायली सैनिक आणि हिजबुल्लाहच्या जवानांमध्ये चकमक झाली. याठिकाणी सतत स्फोट सुरू होते. त्यात स्फोटामुळे एक कार हवेत उडाली, जी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत उंच उडाल्याचे लोकांनी पाहिले. अनेक घरांचेही नुकसान झाले. नबी शीत आणि आसपासच्या भागात झालेल्या हल्ल्यांमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला आणि ४० जण जखमी झाले अशी माहिती इथल्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इस्रायली संरक्षण दलाकडून शुक्रवारी कारवाईपूर्वी परिसरातील रहिवाशांना स्थलांतर करण्याची सूचना देण्यात आली होती. संभाव्य हल्ल्याची शक्यता पाहता लहान मुलांना आधीच शहरातून बाहेर काढल्याचे नबी शीतचे महापौर हानी मौसावी यांनी माहिती दिली. 

रॉन अराद कोण होते?

रॉन अरादच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी लेबनॉनमध्ये एक विशेष मोहीम राबवली, परंतु त्यात कोणताही शोध लागला नाही असं इस्रायली लष्कराने शनिवारी पुष्टी केली. तर ही मोहीम अयशस्वी झाली असली तरी इस्रायल आपल्या सर्व बेपत्ता सैनिकांना शोधण्यासाठी वचनबद्ध आहे असं  इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं. १९८६ मध्ये लेबनॉनमध्ये एका मोहिमेदरम्यान त्यांचे लढाऊ विमान कोसळले तेव्हा रॉन अराद बेपत्ता झाले होते. विमानातून बाहेर पडल्यानंतर त्यांना पकडण्यात आले होते. परंतु त्यानंतर ते मृत झाल्याचे बोलले जाते. परंतु त्यांचे अवशेष अद्याप सापडलेले नाहीत.
 

Web Title : लेबनान में इजरायल का ऑपरेशन विफल; हिजबुल्लाह के साथ संघर्ष में 41 की मौत

Web Summary : लेबनान में रॉन अराद के अवशेष खोजने का इजरायली ऑपरेशन विफल। हिजबुल्लाह के साथ संघर्ष में 41 की मौत, 40+ घायल। नेतन्याहू ने लापता सैनिकों को खोजने का वादा किया।

Web Title : Israel's Lebanon Operation Fails; Hezbollah Clash Kills 41.

Web Summary : Israeli operation in Lebanon to find remains of Ron Arad fails. Clash with Hezbollah kills 41, injures 40+. Netanyahu vows to find missing soldiers.