Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 20:10 IST2026-04-08T20:07:07+5:302026-04-08T20:10:06+5:30
Israel Air Strikes in Lebanon; War likely to escalate: इराणसोबत शस्त्रसंधी केल्यानंतर इस्रायलने आपला मोर्चा लेबनानकडे वळवला आहे. इस्रायलच्या लष्कराने लेबनानच्या शहरांना लक्ष्य करत मिसाईल्स डागल्या.

Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
Israel-Lebanon War: नागरिकांना शहर सोडून जाण्याचा इशारा दिल्यानंतर इस्रायलने लेबनानमधील टायर शहरासह इतक शहरांमध्ये हल्ले केले. इस्रायली लष्कराने सांगितले की, युद्ध सुरू झाल्यापासूनच सर्वात मोठे हल्ले लेबनानवर करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतरची अनेक दृश्य समोर आली आहेत.
इस्रायलच्या लष्कराने म्हणजे आयडीएफने बुधवारी लेबनानमधील टायर शहरातील नागरिकांना घरे रिकामी करण्याचा इशारा दिला होता. लोकांनी तत्काळ घरे रिकामी करावीत आणि जहरानी नदीच्या उत्तरेला जावे, तिथे तुम्ही सुरक्षित राहाल, असे आयडीएफने म्हटले होते.
#WATCH | US-Israel vs Iran war: | Missiles hit Tyre in southern Lebanon.
— ANI (@ANI) April 8, 2026
(Video Source: Reuters) pic.twitter.com/laMuisQx0z
इस्रायलने टायर शहरासह बैरुत, बेका आणि दक्षिण लेबनानला लक्ष्य केले. मिसाईल्स हल्ले कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हल्ल्यानंतरची दृश्यही भयंकर आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी हल्ल्याचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
Chaos in Beirut as Israel carries out a wave of airstrikes across the country hitting what it said were more than 100 targets in ten minutes. pic.twitter.com/t0If72xogY
— Will Christou (@will_christou) April 8, 2026
इस्रायलने लेबनानमध्ये हल्ले का केले?
इराणसोबत एकीकडे शस्त्रसंधी झालेली असताना इस्रायलने लेबनानमध्ये हल्ले का सुरू केले? असे प्रश्न उपस्थित होत आहे. इस्रायलकडून याचे उत्तर देण्यात आले आहे.
नागरिक वस्त्यांवर हवाई हल्ले करण्यामागे हिजबुल्लाह हे कारण असल्याचे आयडीएफने म्हटले आहे. नागरिक वस्त्यांच्या मध्यवर्ती ठिकाणीच हिजबुल्लाहचे लोक असल्याचा दावा आयडीएफने केला आहे.
The Israeli military declares the biggest attack across Lebanon since the start of what it calls Operation Roaring Lion, hitting Beirut, Bekaa and the south with 100 simultaneous strikes. The IDF admits it’s hitting civilian areas saying Hezbollah is ‘embedded in the heart of… pic.twitter.com/fOlplcQ27q
— Alex Crawford (@AlexCrawfordSky) April 8, 2026
इस्रायलच्या हल्ल्यांनंतर लेबनानमधील काही शहरातील परिस्थित भयंकर होती. सगळीकडे धुराचे लोट होत आणि पडलेल्या इमारतींच्या धुळीने रस्ते अदृश्य झाले होते. लोक जीव वाचवण्यासाठी धावत होते.
JUST IN: 🇮🇱🇱🇧 Another video shows the aftermath of Israel's largest strike on Beirut, Lebanon. pic.twitter.com/ZUQCIj493c
— BRICS News (@BRICSinfo) April 8, 2026
लेबनानमध्ये १५०० लोकांचा मृत्यू
इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाहकडून इस्रायलमध्ये हल्ले केले गेले. त्यानंतर इस्रायलने पलटवार सुरू केले. लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणांना इस्रायलकडून लक्ष्य केले जात आहे. पण, यात नागरिकांचे बळी जात आहेत. या संघर्ष सुरू झाल्यापासून लेबनानमध्ये तब्बल १५०० लोक मरण पावले आहेत, तर १२ लाख लोक घरंदारं सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.