'इंडिया'चा निरोप घेऊन पत्रकाराने इस्रायलसाठी हाती घेतले शस्त्र; ट्विट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 08:23 PM2023-10-09T20:23:08+5:302023-10-09T20:25:00+5:30

दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी युद्धाची घोषणा केली आहे.

israel journalist said Goodbye to 'India' and Takes Up Arms for Israel | 'इंडिया'चा निरोप घेऊन पत्रकाराने इस्रायलसाठी हाती घेतले शस्त्र; ट्विट करत म्हणाला...

'इंडिया'चा निरोप घेऊन पत्रकाराने इस्रायलसाठी हाती घेतले शस्त्र; ट्विट करत म्हणाला...

googlenewsNext

Israel-Hamas war:इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास, यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या अनेक भागात हमासने रॉकेट डागले आहेत. अनेक भागात हमासचे दहशतवादी आणि इस्रायली सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या सहल्ल्यांमुळे इस्रायलमधील अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी अनेक इस्रायली नागरिक बंकरमध्ये लपून बसले आहेत.

अशा परिस्थितीत एका इस्रायली पत्रकाराने देशाच्या रक्षणासाठी हाती शस्त्र घेतले आहे. हानान्या नफताली नावाच्या पत्रकाराने ट्विट करून 'इंडिया'चा निरोप घेतला. त्याचे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. त्याने ट्विट केले की, देशाची सेवा आणि संरक्षण करण्यासाठी माझी नियुक्ती करण्यात आली आहे. मी माझी पत्नी, 'इंडिया'चा निरोप घेतला. आतापासून ती माझ्या वतीने ट्विटरवर पोस्ट करेल, असे ट्विट त्या पत्रकाराने केले.

दरम्यान, हमासने इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे. इस्रायलदेखील गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर बॉम्बफेक करत आहे. यामध्ये हमासची 800 हून अधिक ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. तसेच, 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात अनेक मशिदी आणि बहुमजली इमारतीही उद्ध्वस्त झाल्या आहेत.

Web Title: israel journalist said Goodbye to 'India' and Takes Up Arms for Israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.