शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:40 IST

Israel Iran War: इराणने विमातळ बंद ठेवले आहेत. एअरस्पेसही बंद आहे. यामुळे आपल्या नागरिकांना आणण्यासाठी भारताची विमाने थेट इराणमध्ये जाऊ शकत नाहीत. इराणने दोन दिवसांपूर्वीच सीमा खुली असल्याचे नागरिकांना सांगितले होते.

इस्रायलनेइराणवर जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. लष्करी ठिकाण्यांवर हल्ले होत असताना नागरिकही मारले जात आहेत. यामुळे सुमारे १५०० विद्यार्थ्यांसह १० हजार भारतीय नागरिक इस्रायलच्या हवाई हल्ल्यांखाली जीव मुठीत घेऊन मदतीची हाक देत आहेत. इराणमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, तसेच फोन लावला तर १५-१६ वेळा डायल करावा लागत आहे. अशातच इराणच्या शेजारील देश आर्मेनियाने भारताला मदतीचा हात दिला आहे. 

इराणने विमातळ बंद ठेवले आहेत. एअरस्पेसही बंद आहे. यामुळे आपल्या नागरिकांना आणण्यासाठी भारताची विमाने थेट इराणमध्ये जाऊ शकत नाहीत. इराणने दोन दिवसांपूर्वीच सीमा खुली असल्याचे नागरिकांना सांगितले होते. यामुळे परदेशी नागरिकांबरोबरच स्थानिक इराणी नागरिकांनी देखील इराणबाहेर पलायन करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून या प्रचंड वाहतुकीचे फोटो येत आहेत. 

अशातच भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधून बाहेर काढण्यासाठी  भारताने इराणमधील आर्मेनियाच्या राजदुतांशी संपर्क साधला होता. कारण ११० विद्यार्थी सोमवारी आर्मेनियाच्या बॉर्डरवर पोहोचले होते. इराण सोडण्यापूर्वी, परदेशी नागरिकांना त्यांचे नाव, पासपोर्ट क्रमांक, वाहनांची माहिती, देशातून निघण्याची वेळ आणि त्यांना ओलांडायची असलेली सीमा राजनैतिक मिशनद्वारे इराणच्या जनरल प्रोटोकॉल विभागाला द्यावी लागणार आहे. 

आर्मेनिया हा भारताचा चांगला मित्र देश आहे. अनेक संरक्षण करार उभयतांत झालेले आहेत. तसेच इराणची महत्वाची शहरे या देशापासून अत्यंत जवळ आहेत. इराणमधून भारतीयांना आर्मेनियात सहज प्रवेश दिला जाणार आहे. तिथून हे भारतीय येरेवन विमानतळावर येणार आहेत. या विमानतळावरून या लोकांना पु्हा भारतात आणले जाणार आहे. इराण आणि आर्मेनियामध्ये सध्या कोणताही सीमा वाद किंवा लष्करी तणाव नसल्याने भारतासाठी हे सोपे गेले आहे. 

भारत-इराणच्या मध्ये पाकिस्तानही होता...भारत आणि इराणच्या मध्ये पाकिस्तान देखील आहे. परंतू, भारताचे पाकिस्तानसोबत संबंध ताणलेले आहेत. गो इंडिगोच्या विमानाला पाकिस्तानने संकटकाळात येऊ दिले  नव्हते, तर या भारतीयांना मदत करणे दूर राहिले. तसेच अफगाणिस्तान देखील यात आहे. अफगाणिस्तानसोबतही भारताचे चांगले संबंध आहेत. परंतू, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये सीमा वाद आहे. यामुळे भारताने आर्मेनियाला निवडले आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धPakistanपाकिस्तान