शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:15 IST

Israel Iran Attack News: इस्रायलने अणुऊर्जा केंद्रावरच हवाई हल्ले केल्यानंतर इराणने प्रतिहल्ला चढवला. इस्रायलच्या तेल अवीव शहरात इराणने मिसाईल्स आणि ड्रोन डागले. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. 

Israel Iran Conflict: 13 जून रोजी इस्रायलनेइराणच्या अणुऊर्जा आणि लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. यात अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि वैज्ञानिक मारले गेले. त्यानंतर खवळलेल्या इराणनेइस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स सोडले. यामुळे इस्रायलमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्झ यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांना इशारा दिला आहे. इराणने हल्ले थांबवावेत नाहीतर तेहरानला आग लावू, असा धमकी वजा इशारा कात्झ यांनी दिला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पेटला आहे. इस्रायलने हल्ले केल्यानंतर इराणने मिसाईल्स आणि ड्रोन्स इस्रायलवर डागले. तेल अवीव इतर काही शहरात मिसाईलमुळे नुकसान झाले आहे. इराणकडून हल्ले सुरूच असून, इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्झ यांनी इराणला इशारा दिला आहे. 

इस्रायलने इराणला काय दिला इशारा?

इराणसोबतचा लष्करी संघर्ष वाढल्यानंतर इस्रायलमध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला आयडीएफ (इस्रायल डिफेन्स फोर्सेस) चे चीफ ऑफ स्टाफ एयार जामीर, मोसादचे प्रमुख डेव्हिड बारनेआ आणि इतर लष्करी अधिकारी उपस्थित होते. 

वाचा >>इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

संरक्षण मंत्री कात्झ म्हणाले, "इराणचा हुकुमशाह स्वतःच्याच नागरिकांना ओलीस ठेवू लागला आहे आणि अशी परिस्थिती तयार करत आहे; ज्यात विशेषतः तेहरानच्या नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागेल."

कात्झ यांनी अयातुल्ला खोमेनी यांना धमकी वजा इशारा देत म्हटले की, "जर खोमेनी इस्रायलच्या नागरिकांवर मिसाईल्स डागत राहिले, तर आम्ही तेहरानला आग लावू."

इराणच्या २५ टक्के मिसाईल पाडण्यात अपयश

आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, मागील रात्रीपासून आतापर्यंत इराणने इस्रायलवर तब्बल २०० बॅलेस्टिक मिसाईल डागल्या आहेत. यात बहुतांश मिसाईल्स इस्रायलच्या एअर डिफेन्सने हवेतच नष्ट केल्या. पण, अंदाजानुसार २५ टक्के मिसाईल्स इंटरसेप्ट झाल्या नाही. त्या पाडण्यात अपयश आले आणि काही मोकळ्या जागेत पडल्या.

इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, इराणच्या काही मिसाईल्स चकमा देऊन इस्रायलमधील नागरी भागात कोसळल्या. तेल अवीव, रमात गन आणि रिशोल लेजिओने या शहरात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्ध