शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:32 IST

Israel-Iran War: पाकिस्तानने मुस्लिम देशांना एकत्र येऊन इराणला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे, पण...

Israel-Iran War:इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इस्रायलने गेल्या आठवड्यात इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील बहुतांस मुस्लिम देशांनी हल्ल्याची तीव्र निंदा केली. सौदी अरेबियाने तर इराणला आपला भाऊ म्हटले आणि इस्रायलचा हल्ला इराणच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षिततेला धक्का पोहोचवतो असून, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया दिली. तुर्कीनेही या हल्ल्याचा निषेध केला आणि इस्रायल, संपूर्ण प्रदेशाला युद्धात ढकलू इच्छित असल्याचे म्हटले.

मुस्लिम देश इरामपासून दूरइराणचे शेजारील मुस्लिम देश इजिप्त, लेबनॉन आणि इराक यांनीही इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला, परंतु इस्रायलविरुद्ध इराणच्या समर्थनार्थ कोणीही उघडपणे समोर आले नाही. मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननेही या संघर्षावर कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

मुस्लिम देशांना एकत्र करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नइराणवरील इस्रायली हल्ल्याचा निषेध करताना पाकिस्तानने मुस्लिम देशांना एकत्र येऊन इराणला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोमवारी सांगितले ,की पाकिस्तान देश इराणच्या समर्थनार्थ जगातील मुस्लिम देशांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरुन शांतता प्रस्थापित होईल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीदेखील बुधवारी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले की, इराण आणि इस्रायलमध्ये तात्काळ युद्धबंदी करावी, अन्यथा या प्रदेशातील बिघडणारी परिस्थिती केवळ मध्य पूर्वेसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी घातक ठरेल.

एकीकडे, पाकिस्तान इराणला पाठिंबा देत आहे आणि संपूर्ण जगातील मुस्लिमांना इस्रायलविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन करत आहे, तर दुसरीकडे त्याचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर व्हाईट हाऊसमध्ये इस्रायलचे सर्वात मोठे समर्थक आणि सहयोगी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत आहेत. यावरुन पाकिस्तान इराणच्या पाठीशी किती प्रमाणात उभा आहे, हे स्पष्ट होते.

21 मुस्लिम देशांनी व्यक्त केला निषेध21 मुस्लिम देशांनी मंगळवारी इस्रायलच्या इस्रायलच्या इस्रायल हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन जारी केले. निषेध ठरावात या देशांनी इराणच्या अणु तळांवर हल्ले थांबवावेत, आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचा आदर करावा आणि वाद सोडवण्यासाठी राजनैतिक मार्ग निवडावा अशी मागणी केली. निवेदन जारी करणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, तुर्की, इजिप्त, ओमान, कतार, कुवेत, सुदान, सोमालिया, पाकिस्तान, ब्रुनेई, चाड, बहरीन, जिबूती, लिबिया, अल्जेरिया यांचा समावेश आहे.

मुस्लिम देशांनी इस्रायलचा निषेध करणारे निवेदन जारी केले, परंतु कोणीही उघडपणे इराणच्या समर्थनार्थ बाहेर आलेले नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुस्लिम देश इराणसोबत असल्याचे भासवत आहेत, पण त्यांच्याकडे तेवढी क्षमता नाही. मुस्लिम देशांना अशी भीती आहे की, जर ते इराणसोबत आले, तर ते अमेरिका आणि इस्रायलचे शत्रू बनतील. हे त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे त्यांच्या हिताचे ठरणार नाही.

खमेनींच्या राजवटीला धोकाइराणवरील हल्ल्यांमध्ये इस्रायलने इराणचे सर्वोच्च लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञ मारले. इस्रायलला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनाही मारायचे होते, पण अमेरिकेने ते थांबवले. एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले होते की, आतापर्यंत इराणींनी एकाही अमेरिकन नागरिकाला मारले नाही, त्यामुळे अमेरिका इराणच्या राजकीय नेतृत्वालाही लक्ष्य करणार नाही. यानंतर फॉक्स न्यूजशी बोलताना इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संकेत दिले होते की, इराणमध्ये सत्ता परिवर्तन होऊ शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, इराणशी वाटाघाटी करण्यास आता खूप उशीर झाला आहे. पुढील आठवड्यात काहीतरी मोठे घडणार आहे. अशा परिस्थितीत इराणमधील खमेनी सरकारला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान