शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:10 IST

Israel Iran War : इस्त्रायल आणि इराणमध्ये काही दिवसांपासून तणाव सुरू आहे.

Israel Iran War : मागील काही दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये तमाव सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले वाढवले आहेत.  इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इराणने आपल्या नागरिकांना व्हॉट्स अ‍ॅप डिलिट करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने लोकांना त्यांच्या स्मार्टफोनमधून व्हॉट्स अ‍ॅप  काढून टाकण्यास सांगितले. व्हॉट्स अ‍ॅपने इस्रायलला पाठवण्यासाठी वापरकर्त्यांचा डेटा गोळा केला आहे असा दावा करण्यात आला.

व्हॉट्स अ‍ॅपने इस्रायलला गुप्तचर माहिती पाठवली आहे आणि ही माहिती इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद वापरू शकते, अशी शंका इराणने व्यक्त केली आहे. 

पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

व्हॉट्स अ‍ॅने दिले स्पष्टीकरण

दरम्यान, यावर व्हॉट्सअपने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. "लोकांना त्यांची सर्वात जास्त गरज असताना आमच्या सेवा ब्लॉक करण्यासाठी हे खोटे अहवाल एक निमित्त म्हणून काम करतील याची त्यांना चिंता आहे. व्हॉट्स अ‍ॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरते. याचा अर्थ असा की दरम्यान कोणताही सेवा प्रदाता तुमचे संदेश वाचू शकत नाही" ,असं यामध्ये म्हटले आहे.

"आम्ही तुमचे अचूक स्थान ट्रॅक करत नाही. आम्ही प्रत्येकजण कोणाला मेसेज करत आहे याची नोंद ठेवत नाही आणि लोक एकमेकांना पाठवत असलेल्या खासगी संदेशांचा आम्ही मागोवा घेत नाही. आम्ही कोणत्याही सरकारला कोणतीही माहिती देत ​​नाही," असे निवेदनात म्हटले आहे.

जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल

जगातील अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण सुरू आहे. इराण आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्व संकटाचा सामना करत आहे, तर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध देखील थांबत नाहीये. दरम्यान, G-7 शिखर परिषदेमुळे कॅनडामध्ये जागतिक नेत्यांची गर्दी जमली आहे. जागतिक हवाई वाहतुकीचा एक धक्कादायक फोटो समोर आला आहे. 

Flightradar24 ने सोशल मीडियावर हवाई वाहतुकीचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये, विमानांनी जगातील बहुतेक देश पूर्णपणे व्यापले आहेत, तर 2 देशांसह 3 ठिकाणी 'नो फ्लाय झोन' देखील दिसत आहे.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप