शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

अणु करार करा, अन्यथा आणखी विनाशाला तयार राहा...डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:19 IST

Israel-Iran War: इस्रायलने इराणवर हल्ला केल्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

Israel-Iran War:इस्रायलनेइराणवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने बदला घेण्याची घोषणा केली आहे. अशातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुकराराबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यांनी इराणला इशारा दिला की, इस्रायलकडे अनेक धोकादायक शस्त्रे आहेत. अणु कराराला विरोध करणारे सर्व मारले गेले. इराणकडे अजूनही संधी आहे, आता करार करा, नाहीतर आणखी विनाश होईल.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशाराट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये म्हटले की, मी इराणला करार करण्यासाठी अनेक संधी दिल्या आहेत. त्यांना कडक शब्दात करार करण्यास सांगितले, पण त्यांनी अद्याप मान्य केले नाही. काही इराणी कट्टरपंथी या कराराला विरोध करत होते, पण ते सर्व आता मारले गेले आहेत. इस्रायलकडे अनेक घातक शस्त्रे आहेत, पुढे जे घडेल, ते आणखी वाईट असेल. आधीच खूप मृत्यू आणि विनाश झाला आहे, पण हा नरसंहार संपवण्यासाठी अजूनही वेळ आहे, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. 

इस्रायलचे इराणवर हल्ले इस्रायलने शुक्रवारी इराणच्या अणु आणि लष्करी तळांना लक्ष्य केले. इराकशी युद्धानंतर इराणवर हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. इराणच्या वेगाने वाढणाऱ्या अणुकार्यक्रमावरील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचा हल्ला झाला आहे. इस्रायली हल्ल्यात रेव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख जनरल हुसेन सलामी यांचेही निधन झाले आहे. यासोबतच इराणचे सशस्त्र दल प्रमुख जनरल मोहम्मद बघेरी यांचाही मृत्यू झाला आहे. 

इस्रायली हल्ल्यानंतर रशियाचे मोठे विधानइराणवरील हल्ल्यानंतर सौदी परराष्ट्रमंत्र्यांनी इराणी परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी इस्रायली हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रशियानेही इस्रायल-इराण युद्धावर एक निवेदन दिले आहे. रशियाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. तसेच, रशियन परराष्ट्र मंत्रालयाने इराणवर केलेल्या हल्ल्याला संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलला प्रत्युत्तराचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाIsraelइस्रायलIranइराणwarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प