इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:48 IST2025-06-26T10:45:45+5:302025-06-26T10:48:42+5:30

Israel, America - Iran ceasefire: नाटोची शिखर परिषद बुधवारी नेदरलँडमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला जाताना ट्रम्प यांनी चीन आता इराणचे तेल खरेदी करू शकतो, असे म्हटले होते. तसेच चीन अमेरिकेकडूनही तेल खरेदी करेल अशी आशा असल्याचेही ते म्हणाले होते.

Israel, Iran- America war: Iran showed bravery in war, I will not stop them now for sale cruid oil; Trump's big statement at NATO summit | इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

नाटोच्या शिखर परिषदेतून मोठी बातमी येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर स्तुतीसुमने उधळली आहेत. इराणने युद्धात मोठे शौर्य दाखविल्याचे ते म्हणाले आहेत. 

युद्धानंतर इराणचे खूप नुकसान झाले आहे. त्यांना त्यातून सावरण्याची गरज आहे. ते तेलाचा व्यापार करतात, मी हवे तर त्यांना त्यापासून रोखू शकतो. पण मी तसे करणार नाही, असे ट्रम्प म्हणाले आहेत. पुढच्याच आठवड्यात इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा होणार आहे. युद्धात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना तेल विकण्याची गरज आहे. चीनला जर त्यांच्याकडून तेल खरेदी करायचे असेल तरी आम्हाला आता काहीच हरकत नाही, असे ट्रम्प म्हणाले आहे.

नाटोची शिखर परिषद बुधवारी नेदरलँडमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला जाताना ट्रम्प यांनी चीन आता इराणचे तेल खरेदी करू शकतो, असे म्हटले होते. तसेच चीन अमेरिकेकडूनही तेल खरेदी करेल अशी आशा असल्याचेही ते म्हणाले होते. 

अमेरिकेने इराणच्या या अणुकार्यक्रमामुळे गेल्या काही वर्षांपासून कठोर निर्बंध लादले होते. इराण हा महत्वाचा कच्चे तेल उत्पादक देश आहे. परंतू या निर्बंधांमुळे भारतही इराणकडून जास्त तेल खरेदी करू शकत नव्हता. कोरोना आणि या निर्बंधांमुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या होत्या. यामुळे अमेरिकेसह जगभरात महागाई वाढली होती. आता ट्रम्प हे इराणला या निर्बंधांत सवलत देण्याचा विचार करत असल्याचे समोर येत आहे.

व्हाईट हाऊसनुसार इराणची सर्व अणुठिकाणे नष्ट झाली आहेत. परंतू, ४०० किलो समृद्ध युरेनियम गायब झाले आहे. हे युरेनियम १० अणुबॉम्ब तयार होतील एवढे प्रचंड ताकदीचे आहे. ६० टक्के समृद्ध झालेले असून ते ९० टक्के समृद्ध होण्यास २०-३० दिवस लागू शकतात. म्हणजेच इराण पुढील महिन्याभरात अण्वस्त्रसज्ज होणार होता. त्यापूर्वीच इस्रायलने इराणवर हल्ले केले होते. 

Web Title: Israel, Iran- America war: Iran showed bravery in war, I will not stop them now for sale cruid oil; Trump's big statement at NATO summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.