शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:08 IST

Israel Iran, America war Ceasefire: अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर लगेचच इराणने कतारमधील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ले चढविले होते. यामुळे कतारमधील नागरिकही हादरले आहेत. हे युद्ध पेटले तर कतारमध्येही मिसाईल कोसळायला वेळ लागणार नव्हती.

मध्य पूर्वेत आज एक युद्ध शमले आहे. इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेने उडी घेत हल्ला करून सीझफायरही करायला लावले आहे. या घडामोडींमागे कतारचा देखील हात आहे. इराणला मुस्लिम देश मदत करतील अशी अपेक्षा होता. परंतू, इराण या देशांचा लीडर बनायला गेला आणि मित्रदेश गमावून बसला अशी वेळ या देशावर आली आहे. 

अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर लगेचच इराणने कतारमधील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ले चढविले होते. यामुळे कतारमधील नागरिकही हादरले आहेत. हे युद्ध पेटले तर कतारमध्येही मिसाईल कोसळायला वेळ लागणार नाही. जेव्हा अमेरिकेने कतार, सौदीसह मध्य पूर्वेतील देशांवर बंधणे लादली होती. तेव्हा इराणने मध्यस्थी करत ही बंधणे उठविली होती. आता कतार इराणच्या मदतीला आला आहे. 

कतारवर हल्ला करण्यापूर्वी इराणने कतारला कल्पना दिली होती. तासभर आधी कतारला कळविले होते. यामुळे अमेरिकेने आपली महागडी महत्वाची विमाने एअरबेसवरून हटविली होती. या साऱ्या साट्यालोट्यामुळे इराणची बदला घेण्याची व जगासमोर इज्जत वाचविण्याची गरज शमली. कतारच्या शेखने आपल्यावर हल्ला होऊनही इराणला फोन फिरविला आणि सीझफायरसाठी राजी केले.  

हल्लीच्या काळात जगभरात जे काही हल्ले झाले, वाद झाले कतारने यात मध्यस्थीची भूमिका निभावली आहे. तसे पाहता कतारकडे पैसा आहे पण सैनिकी ताकद नाहीय. तरीही ट्रम्प कतारच्या शेखकडे पोहोचले. इस्रायलला मी समजावतो, तुम्ही इराणला समजवा असा संदेश त्यांनी कतारच्या शेखकडे दिला. तिथून पुढे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान यांनी इराणला खामेनींना फोन केला व सुत्रे हलविली. 

कतारने अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या सैन्य वापसीमध्ये देखील महत्वाची भूमिका बजावली होती. तालिबानसोबत अमेरिकेची चर्चा कतारनेच घडवून आणली होती. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान कतारने अनेक वेळा मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इस्रायलवरील हल्ल्यांनंतर हमासने २५० लोकांना बंदी बनविले होते. त्यांना सोडविण्यासाठी कतारनेच मध्यस्थी केली होती. २००८ मध्ये, कतारने लेबनॉनमधील यादवी युद्ध संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

 

टॅग्स :QatarकतारIranइराणIsraelइस्रायल