israel helped america in soleimani killing claimed media reports | 'त्या' देशाच्या मदतीनं अमेरिकेनं काढला सुलेमानींचा काटा

'त्या' देशाच्या मदतीनं अमेरिकेनं काढला सुलेमानींचा काटा

वॉशिंग्टन: इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराणचे संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. जनरल कासीम सुलेमानींची हत्या करण्याच्या ऑपरेशनमध्ये इस्रायलनं अमेरिकेला गुप्त माहिती पुरवली होती, अशी बाब मीडिया रिपोर्ट्समधून उघड झाली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या या ऑपरेशनबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहूंनाही पूर्वकल्पना होती.
 
न्यूयॉर्क टाइम्सनुसार, नेत्यान्याहूंनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती. या खुलाशानंतर इस्रायल आणि इराणमधले संबंधही बिघडले आहेत. अमेरिकेला इस्लामी रेव्हॉल्युशनरी गार्डचे जनरल सुलेमानींची सीरियाच्या विमानतळावरील उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर इस्रायलनं याची खातरजमा केली आणि अमेरिकेला याची सूचना दिली होती.  इराकच्या दमिश्कमधून बगदादपर्यंत उड्डाण करण्याची माहिती दिली होती. 3 जानेवारीला सुलेमानींविरोधात ऑपरेशनसाठी माहिती मिळाल्यानंतर या घटनेला परिणाम दिला आहे. अमेरिकेच्या यंत्रणांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुलेमानींच्या हालचालींवर नजर ठेवली होती. या सर्व माहितीची खातरजमा झाल्यानंतर अमेरिकेनं सुलेमानीवर हल्ला करण्याची योजना आखली.  

विमानतळावर होते हेर
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, सुलेमानीसंदर्भात माहिती देण्यासाठी विमानतळावर काही कर्मचारीसुद्धा हेरगिरी करत होते. यातील एक दमिश्क विमानतळावर काम करत होता. तसेच इतर तीन ते चार हेरांनी अमेरिकेला सुलेमानींच्या ठावठिकाण्याबाबत इत्यंभूत माहिती दिली होती. बगदाद एअरपोर्टवर दोन सुरक्षा अधिकारी आणि चाम एअरलाइन्सवर दोन कर्मचाऱ्यांनी कासीम सुलेमानींच्या संदर्भात अमेरिकेला माहिती दिली होती. चाम एअरलाइन्सच्या विमानातूनच कासीम सुलेमानी बगदादमध्ये पोहोचले होते. 

इस्रायलनं सुरक्षेचं जाळं केलं मजबूत
अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलनंसुद्धा सुरक्षा कवच आणखी मजबूत केलं आहे. इस्रायलनं अत्याधुनिक आयरन डॉम वायुरक्षक तंत्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे. त्यामुळे इस्रायलच्या एअर डिफेन्स यंत्रणेत बळकटी आली आहे.  
 

Web Title: israel helped america in soleimani killing claimed media reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.