शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

"गाझावरील हल्ले थांबवले नाहीत तर...", आता इराणची इस्रायलला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 23:57 IST

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनीही इस्रायलने गाझावरील हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणने खुले आव्हान दिले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियन यांनी गाझा पट्टीवर बॉम्बफेक थांबवली नाही तर त्याचे परिणाम इस्रायलला भोगावे लागतील, असे म्हटले आहे. तसेच, गाझावरील इस्रायलचा हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. सर्व पर्याय खुले आहेत आणि आम्ही गाझाच्या लोकांविरुद्ध केलेल्या युद्धगुन्ह्यांकडे डोळेझाक करू शकत नाही. आम्ही इस्रायलशी दीर्घकालीन युद्ध करण्यास सक्षम आहोत, असेही  हुसेन अमीर अब्दुल्लाहियन  म्हणाले. 

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनीही इस्रायलने गाझावरील हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. गाझामध्ये इस्रायलचे हल्ले असेच सुरू राहिले तर जगभरातील मुस्लिमांना आणि इराणच्या प्रतिकार शक्तींना कोणीही रोखू शकणार नाही, असे अयातुल्ला अली खामेनेई यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी सांगितले की, आम्ही युद्ध सुरू केले नाही. त्यांनी आम्हाला लढण्यास भाग पाडले. हमासविरुद्धच्या या युद्धात आंतरराष्ट्रीय समुदाय आमची साथ देईल, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आदर करतो.

दरम्यान, इराणचे नेते 1979 च्या इस्लामिक क्रांतीपासून पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहेत. खरंतर, तेहरान पॅलेस्टाईनच्या इस्लामिक गट हमासला आर्थिक आणि लष्करी मदत करत आहे. तर आता इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. हमास आणि इस्रायलमधील युद्ध 11 व्या दिवशीही सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला होता, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 4200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हमासचा वरिष्ठ कमांडर ठारइस्त्रायल सध्या दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे. एकीकडे ते गाझा पट्टीतून हमासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. दुसरीकडे, हिजबुल्लाहचे दहशतवादी लेबनॉनमधून हल्ले करत आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल हवाई हल्ले करत आहे. आता इस्रायली लष्कराने हमास कमांडर मारला गेल्याचे म्हटले आहे. इस्रायली सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात अयमान नोफल (Ayman Nofal) ठार झाला आहे. तो हमासचा वरिष्ठ कमांडर असल्याचे सांगितले जाते. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, अयमान हा हमासच्या जनरल मिलिटरी कौन्सिलचा सदस्य होता. याशिवाय, इस्रायली लष्कराने दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या दोन दहशतवाद्यांनाही ठार केले आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIranइराणGaza Attackगाझा अटॅक