शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

इस्रायल हमास युद्ध: गाझावरील हल्ल्यांमध्ये वाढ, मृतांची संख्या ७,६५० वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 05:39 IST

इस्रायल पुढील आदेश येईपर्यंत कारवाई सुरूच ठेवणार

जेरुसलेम : गाझावर जमिनीवरून सुरू केलेले हल्ले सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे इस्रायलच्या लष्कराने स्पष्ट केले. गाझामधील कारवाईची इस्रायलने व्याप्ती वाढविली आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर आजवरच्या संघर्षात गाझामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७६५० वर पोहोचली असून, १९४५० जण जखमी झाले आहेत.

इस्रायलच्या लष्कराचे रिअर ॲडमिरल डॅनियल हगरी यांनी सांगितले की, गाझावर जमिनीवरून हल्ले चढविण्यात येत असून त्यात कुठेही खंड पडलेला नाही. गाझामध्ये इस्रायली रणगाडे शिरल्याचा व्हिडीओ त्या देशाच्या लष्कराने शनिवारी जारी केला. गाझातील भुयारे, बंकर नष्ट करण्यासाठी इस्रायली विमाने बॉम्बहल्ले करत आहेत. अशा प्रकारे गाझा शहरातील उत्तर भागात हमासने बांधलेली १५० भुयारे व बंकर शनिवारी नष्ट केल्याचा दावा इस्रायलने केला. गाझातील मोबाइल सेवा, वीजपुरवठा इस्रायलने बंद पाडला आहे. त्यामुळे गाझातील लोकांचे विलक्षण हाल होत आहेत.

संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्रांत भारताची तटस्थ भूमिका

  • संयुक्त राष्ट्रे : दहशतवाद ही घातक विचारसरणी असून, तिला देशांच्या सीमा, नागरिकत्व, वंश अशा गोष्टींची बंधने नसतात. जगातील कोणत्याही देशाने दहशतवादी कृत्यांचे समर्थन करू नये, अशी ठाम भूमिका भारताने इस्रायल-हमासमधील संघर्षाबाबत मांडली. या संघर्षाबाबत जॉर्डनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडलेल्या प्रस्तावावरील मतदानाप्रसंगी भारत तटस्थ राहिला.
  • इस्रायल-हमासमधील संघर्षात नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, गाझा पट्टीमध्ये शांतता नांदण्यासाठी मानवतावादी दृष्टीकोनातून तत्काळ पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी जॉर्डनने या प्रस्तावात केली होती. १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हा प्रस्ताव शुक्रवारी मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाच्या बाजूने १२१ व विरोधात १४ मते मिळाली. 
  • भारतासह ४४ देश मतदानप्रसंगी तटस्थ राहिले व उर्वरित देश मतदानास अनुपस्थित राहिले. संपूर्ण गाझा पट्टीमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तत्काळ व विनाअडथळा पुरविण्यात याव्यात, अशी मागणीही या प्रस्तावात करण्यात आली होती.
टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धBombsस्फोटकेGaza Attackगाझा अटॅकIsraelइस्रायल