आता काही खरं नाही...! इस्रायलनं आखला इराणच 'कंबर' तोडायचा प्लॅन; 32 देशांना लिहिलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 20:07 IST2024-04-16T20:07:23+5:302024-04-16T20:07:53+5:30
हे दोन्ही देश सध्या ताठर भूमिकेत दिसत आहेत. यातच आता, इस्रायलने इराणला कमकुवत करण्यासाठी एक नवा मास्टर प्लॅन आखला आहे.

आता काही खरं नाही...! इस्रायलनं आखला इराणच 'कंबर' तोडायचा प्लॅन; 32 देशांना लिहिलं पत्र
इराणनेइस्रायलवर हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव आणखीनच वाढला आहे. हे दोन्ही देश सध्या ताठर भूमिकेत दिसत आहेत. यातच आता, इस्रायलनेइराणला कमकुवत करण्यासाठी एक नवा मास्टर प्लॅन आखला आहे. यामुळे आगामी काळात इराणला इस्रायलच्या राजनैतिक डावपेचांचा सामना करावा लागू शकतो. इराणला धडा शिकवण्यासाठी इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तब्बल 32 देशांना पत्र लिहून इराणवर निर्बंध लादण्याचे आवाहन केले आहे.
इस्रायलनं 32 देशांना लिहिलं पत्र -
यासंदर्भात इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल काट्झ यांनी मंगळवारी (16 एप्रिल) एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यात, आपण 32 देशांना पत्र लिहून, इराणच्या मिसाइल कार्यक्रमावर प्रतिबंध घालावेत, असा आग्रह केल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. याच बरोबर, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सवर एक दहशतवादी संघटना म्हणून बंदी घालण्याचाही आग्रह काट्झ यांनी केला आहे.
इराणची कंबर तोडण्याची तयारी -
काट्झ म्हणाले, मी मिसाइल्स आणि ड्रोनच्या गोळीबाराला लष्करी प्रत्युत्तराबरोबरच, इराणविरुद्ध राजनैतिक मोहिमेचेही नेतृत्व करत आहे. 32 देशांना पत्र पाठवले असून जग भरातील डझनावर परराष्ट्रमंत्री आणि प्रमुख मंडळींसोबत बोललो आहे. तसेच या सर्वांकडे, इराणच्या मिसाइल कार्यक्रमावर निर्बंध घालावेत आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्सना एक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.