शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने उपसली ‘तलवार’; मोठी किंमत चुकवावी लागेल; PM नेतान्याहू यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 07:18 IST

गेल्या काही वर्षांत इस्रायलच्या हद्दीत झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. नेतान्याहू यांनी म्हटले की, इस्रायलमध्ये दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या कारवायांचा बीमोड करण्याचा आदेश सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांना दिला आहे. 

जेरुसलेम :  गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यात इस्रायलमधील २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. शत्रूने आमच्यावर केलेल्या हल्ल्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचा इशारा नेतान्याहू यांनी हमासला दिला. गेल्या काही वर्षांत इस्रायलच्या हद्दीत झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. नेतान्याहू यांनी म्हटले की, इस्रायलमध्ये दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या कारवायांचा बीमोड करण्याचा आदेश सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांना दिला आहे. इस्रायल लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, प्रत्युत्तरासाठी इस्रायलने ऑपरेशन आयर्न स्वाेर्ड्स ही मोहीम हाती घेतली आहे. त्याद्वारे जमीन, समुद्रमार्गे तसेच हवाई हल्ल्यांद्वारेही शत्रूला जेरीस आणण्यात येईल. गाझा भागातून हमासच्या दहशतवाद्यांनी हजाराे रॉकेटचा मारा केल्याचा दावा हमासने केला. 

५,००० राॅकेट केवळ २० मिनिटांत डागून हमासने इस्रायलला धक्का दिला.२२ ठिकाणांवर हमासचे अतिरेकी आणि इस्रायलमध्ये चकमक सुरू हाेती.हल्ल्यानंतर एअर इंडियाने शनिवारी तेल अवीवला जाणाऱ्या आपल्या विमानाची फेरी रद्द केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला तीव्र निषेधइस्रायलवर हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात निरपराध लोक व त्यांच्या कुटुंबीयांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे, इस्रायलला बिकट परिस्थितीचा सध्या सामना करावा लागत आहे. त्या देशाला भारताचा संपूर्ण पाठिंबा आहे, असेही मोदी यांनी म्हटले. 

ही पहिली झलक : हमासnहमासच्या लष्कर विभागाचा प्रमुख मोहम्मद डेफ याने सांगितले की, इस्रायलने आमच्यावर केलेले आक्रमण थांबवावे. आम्ही प्रत्युत्तर देणार आहोत. nशनिवारचा हल्ला ही त्याची पहिली झलक आहे. आम्ही क्रांतीची मशाल हाती घेतली आहे, असेही तो म्हणाला.

इस्रायलला अमेरिकेचे ८ अब्ज डाॅलरचे पॅकेजअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी इस्रयालसाठी ८ अब्ज डाॅलरचे तातडीचे लष्करी मदत पॅकेज मंजूर केले आहे. 

इस्रायलमध्ये सध्या किती भारतीय? इस्रायलमध्ये सध्या १८ हजार भारतीय राहत आहेत. इस्रायलमधील वृद्धांची देखभाल, हिऱ्यांचा व्यापार, माहिती- तंत्रज्ञान व अन्य क्षेत्रांमध्ये भारतीय कार्यरत आहेत. अनेक भारतीय विद्यार्थी इस्रायलमध्ये शिकायला आले आहेत. 

 

टॅग्स :Israelइस्रायलPalestineपॅलेस्टाइनwarयुद्ध