इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध १२ दिवसांनी थांबले. मात्र, युद्धदरम्यानइस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्याचा एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांना धडकी भरेल. युद्धात इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला होता, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.
रायझिंग लायन ऑपरेशन दरम्यान इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी इमारतीवर हवाई हल्ला केला. युद्धाच्या शेवटच्या दिवशी हा हल्ला करण्यात आला, असे सांगितले जात आहे. इस्रायली संरक्षण मंत्रालयाकडून आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या हल्ल्यात दोन क्षेपणास्त्रे वापरली गेली. त्यापैकी एक इमारतीला धडकले. तर दुसरे क्षेपणास्त्र ताजरिश चौकात उभ्या असलेल्या वाहनावर पडले. यात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गाड्या हवेत उंच उडाल्या!व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, हल्ल्यानंतर जवळ उभ्या असलेल्या गाड्या खेळण्यांसारख्या हवेत काही फूट उंच उडतात. या हल्ल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर इस्रायलने इराणवर केलेला हल्ला किती भयंकर होता, याची कल्पना येईल.
युद्धात दोन्ही देशांचे नुकसानमिळालेल्या महितीनुसार, युद्धादरम्यान इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात एकूण ९३५ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर, शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्रायलने इराणच्या अणु आणि लष्करी तळांनाही लक्ष्य केले. प्रत्युत्तरात इस्रायलने इस्रायलवर अनेक मोठे हल्ले केले, ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती आयडीएफने दिली.