शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील बड्या नेत्यावर आत्मघाती हल्ल्याचा कट, आयसिसचा दहशतवादी रशियातून अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 14:10 IST

IS Terrorist Arrest: भारतात सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या एका बड्या नेत्यावर आत्मघाती हल्ला करण्याचा कट उधळला गेला आहे. रशियामधून इस्लामिक स्टेट या दहतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

मॉस्को - भारतात सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या एका बड्या नेत्यावर आत्मघाती हल्ला करण्याचा कट उधळला गेला आहे. रशियामधून इस्लामिक स्टेट या दहतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ल्याचा कट आखला होता. रशियामधील सरकारी एजन्सी फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसने या दहशतवाद्याला पकडल्याची माहिती दिली आहे.

रशियन सिक्युरिटी एजन्सीने दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंधित एका दहशतवाद्याची ओळख पटवली होती. त्यानंतर एफएसबीने त्याला ताब्यात घेतले आहे. फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने हा दहशतवादी मध्य आशियातील एका देशातील नागरिक असल्याचे सांगितले आहे. त्याने भारतातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाच्या कुठल्यातरी नेत्यावर हल्ला करण्याचा कट आखला होता. सिक्युरिटी सर्व्हिसने याबाबतची माहिती दिली आहे.

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने एप्रिल ते जून दरम्यान तुर्कीमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते.  आयएसच्या एका नेत्याने त्याला आत्मघातील हल्लेखोर म्हणून भरती केले होते. त्याला आत्मघाती हल्लेखोर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले होते. तो टेलिग्रामच्या माध्यमातून आयएसशी जोडला गेला होता. त्यानंतर त्याने आयएसशी निष्ठेची शपथ घेतली होती.

रशियाच्या सरकारी एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटनेने त्याला आवश्यक कागदपत्रांसह रशियामध्ये पाठवले होते. त्यानंतर तिथून त्याला भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भारतातील सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या नेत्यावर हल्ला करण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले होते. मात्र तो कोणत्या नेत्यावर हल्ला करणार होता, याबाबतची माहिती समोर येऊ शकलेली नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीrussiaरशियाIndiaभारत