डोनाल्ड ट्रम्प यांची व्लादिमीर पुतिन यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची तयारी? दिले मोठे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 09:19 IST2025-03-31T09:19:01+5:302025-03-31T09:19:32+5:30

...खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच यासंदर्भात रविवारी भाष्य केले आहे.

Is Donald Trump preparing to become America's Putin contest the us presidential election for the third time Big hint given | डोनाल्ड ट्रम्प यांची व्लादिमीर पुतिन यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची तयारी? दिले मोठे संकेत!

डोनाल्ड ट्रम्प यांची व्लादिमीर पुतिन यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची तयारी? दिले मोठे संकेत!

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा निवडणूक लढू शकतात. ते रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या पावलावर पाऊल टाकू शकतात (पुतिन यांनी रशियाच्या संविधानात दुरुस्ती करून निवडणूक लढवण्याची मर्यादा हटवली आहे.). असे कसाय गेल्या अनेक दिवसांपासून लावले जात होते. यातच आता, खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच यासंदर्भात रविवारी भाष्य केले आहे. आपली तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाची सेवा करण्याची इच्छा आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजला टेलिफोनवरून एक मुलाखत दिली. यावेळी, देशाच्या सर्वात कठीण नोकरीत सेवा देत राहणे आवडेल? यावर ट्रम्प म्हणाले, "हे बघा मला काम करायला आवडते." एवढेच नाही तर, अमेरिकन जनता आपल्या लोप्रियतेमुळे, आपल्याला तिसऱ्यांदा संधी देण्यास तयार होईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.  म्हणाले   

तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याच्या तयारीत?
ट्रम्प म्हणाले, "मी गांभीर्याने बोलत आहे. अशा काही पद्धती आहेत, ज्याच्या सहाय्याने आपम हे करू शकता. मात्र, यासंदर्भात आताच विचार करणे फार घाईचे होईल.’ परराष्ट्र धोरण तज्ञांच्या मते, ट्रम्प हे २०२९ मध्ये त्यांचा दुसरा कार्यकाळ संपल्यानंतरही, तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत, हे त्यांच्या या विधानावरून स्पष्ट होते. यासाठी ते, दोनपेक्षा अधिक वेळा देशाची सेवा करण्यासंदर्भातील घठनेतील तरतूद  हटविण्यासंदर्भात विचार करत आहेत.

अमेरिकेच्या संविधानात बदल करणार? -
खरे तर, फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे सलल चार वेळा अमेरिकेचे राषट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. यानंतर 1951 मध्ये अमेरिकीच्या संविधानात 22वी घटनादुरुस्ती करण्यात आली. त्यात ‘कुण्याही व्यक्तीला दोनहून अधिक वेळा राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढता येणार नाही,’ असे म्हणण्यात आले. अर्थात, या संशोधनाने अमेरिकेत जास्तीत जास्त 2 वेळाच राष्ट्राध्यक्ष होण्याची मर्यादा घालून दिली आहे. संविधानातील या दुरुस्तीनंतर, निवडून आलेले सर्वच राष्ट्रपती या नियमाचे पालन करत आले आहेत. मात्र, आता ट्रम्प यांच्या मनात काही औरच चालू असल्याचे दिसत आहे.

Web Title: Is Donald Trump preparing to become America's Putin contest the us presidential election for the third time Big hint given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.