जपानमध्ये आयर्न लेडीचा ऐतिहासिक विजय, बहुमताचा आकडा ओलांडला; पंतप्रधान मोदींनी दिल्य शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 00:32 IST2026-02-09T00:31:51+5:302026-02-09T00:32:29+5:30

महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पक्षनेतेपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ताकाइची यांनी ३६ वर्षांनंतर पहिल्यांदाच देशात 'मिड-विंटर' निवडणुकांची घोषणा केली होती. जनतेकडून नवा जनादेश मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

Iron Lady pm sanae takaichi historic victory in Japan, crosses majority mark; PM Modi congratulates her | जपानमध्ये आयर्न लेडीचा ऐतिहासिक विजय, बहुमताचा आकडा ओलांडला; पंतप्रधान मोदींनी दिल्य शुभेच्छा

जपानमध्ये आयर्न लेडीचा ऐतिहासिक विजय, बहुमताचा आकडा ओलांडला; पंतप्रधान मोदींनी दिल्य शुभेच्छा

जपानच्या राजकारणात रविवारी एक नवा इतिहास लिहिला गेला. पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्या नेतृत्वाखालील युतीने 'विंटर स्नैप पोल'मध्ये दणदणीत विजय मिळवला. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ताकाइची या ब्रिटनच्या 'आयरन लेडी' मार्गरेट थॅचर यांच्या विचारांनी प्रेरित आहेत. ४६५ जागांच्या कनिष्ठ सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेला २३३ जागांचा टप्पा सत्ताधारी पक्षाने सहज पार केला. मतमोजणी सुरू झाल्यापासून अवघ्या दोन तासांतच एलडीपीने (LDP) स्वतःच्या बळावर बहुमताचा आकडा गाठला. ही पक्षाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक मानली जात आहे.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन -
या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X'वर पोस्ट करत सानाए ताकाइची यांचे अभिनंदन केले. "ऐतिहासिक विजयाबद्दल सानाए ताकाइची यांचे अभिनंदन. भारत आणि जपानमधील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी जागतिक शांतता व समृद्धीसाठी महत्त्वाची आहे. आपल्या सक्षम नेतृत्वाखाली ही मैत्री नव्या उंचीवर पोहोचेल, असा मला विश्वास आहे," अशा शब्दांत मोदींनी ताकाइची यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जपानमधील अमेरिकेचे राजदूत जॉर्ज एडवर्ड ग्लास यांनीही या विजयाचे स्वागत करत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली.

३६ वर्षांत पहिल्यांदाच मिड-विंटर' निवडणूक -
महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पक्षनेतेपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ताकाइची यांनी ३६ वर्षांनंतर पहिल्यांदाच देशात 'मिड-विंटर' निवडणुकांची घोषणा केली होती. जनतेकडून नवा जनादेश मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमत गमावलेल्या आणि कोमेतो पक्षासोबतची जुनी युती तुटलेल्या स्थितीत ताकाइची यांनी घेतलेला हा निर्णय एक मोठा राजकीय जुगार मानला जात होता. मात्र, ताज्या निकालांनी त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.
 

Web Title : जापान में आयरन लेडी की ऐतिहासिक जीत; पीएम मोदी ने दी बधाई

Web Summary : जापान में सनाए ताकाइची के गठबंधन ने शानदार जीत हासिल की। मार्गरेट थैचर से प्रेरित, ताकाइची ने अपनी पार्टी को निचले सदन में बहुमत दिलाया। पीएम मोदी ने उन्हें बधाई दी और वैश्विक शांति के लिए भारत-जापान संबंधों के महत्व पर जोर दिया। उन्होंने 36 वर्षों बाद मिड-विंटर चुनाव कराए।

Web Title : Iron Lady's Historic Win in Japan; PM Modi Congratulates

Web Summary : Sanae Takaichi's coalition secured a resounding victory in Japan's elections. Inspired by Margaret Thatcher, Takaichi led her party to a majority in the lower house. PM Modi congratulated her, emphasizing the importance of Indo-Japanese relations for global peace. She held mid-winter elections after 36 years.