शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...तर खनिज तेलाचा व्यापार थांबवून जगात हाहाकार उडवू; इराणचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 19:41 IST

अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांवरुन इराण आक्रमक

तेहरान: अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांविरोधात इराणनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेनं इराणकडून होणारी खनिज तेलाची निर्यात थांबवण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा पर्शियाच्या आखातातून सुरू असलेली तेल वाहतूक थांबवून जगात हाहाकार उडवू, असा इशारा इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी दिला आहे. इराणनं हे पाऊल उचलल्यास जगातील अनेक देश अडचणीत सापडू शकतात. कारण पर्शियाच्या आखातामधूनच मध्य पूर्व आशियातील देश जगभरात तेलाची वाहतूक करतात. आखाती भागातील बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे देश जगभरात तेलाची निर्यात करतात. या देशांमधून निघणारी खनिज तेलाची जहाजं पर्शियाच्या आखातामधूनच जातात. इराणनं या भागातून होणारी तेलाची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा सर्वाधिक फटका सौदी अरेबियाला बसेल. कारण सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. सौदीकडून जगातील अनेक देशांना तेल पुरवठा होतो.1980 ते 88 च्या दरम्यानदेखील पर्शियाचं आखात वादाच्या केंद्रस्थानी होतं. त्यावेळी सौदी अरेबिया आणि इराणनं एकमेकांच्या जहाजांवर हल्ले केले होते. 1980 नंतर इराणनं अनेकदा या भागातून होणारी तेल वाहतूक रोखण्याची धमकी दिली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव आल्यावर इराणनं अनेकदा धमकी अस्त्र उगारलं. मात्र ही धमकी अंमलात आणली नाही. 2015 मध्ये तेहरान अणू करारापासून वेगळं झाल्यानंतर अमेरिकेनं इराणवर निर्बंध लादले. या निर्बंधांतर्गत इराणला तेल निर्यात बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र यातून आठ देशांना वगळण्यात आलं आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे.  

टॅग्स :Crude Oilखनिज तेलIranइराणUSअमेरिकाsaudi arabiaसौदी अरेबिया