Iran Israel War Update: मध्य पूर्वेतील युद्ध लवकर थांबण्याची शक्यता धूसर होताना दिसत आहे. कारण इस्रायल-अमेरिकेकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांना इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इराणच्या एका सरकारी मीडियाने म्हटले आहे की, इराणने केलेला हा हल्ला युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठा हल्ला आहे.
इराण आणि हिजबुल्लाहने संयुक्तपणे क्लस्टर बॉम्ब हल्ला केला आहे. हे हल्ले इस्रायलमधील तेल अवीवसह इतर ठिकाणांवर करण्यात आले आहे. त्याचबरोबर संयुक्त अरब अमिरातीच्या किनाऱ्यावर असलेल्या युद्धनौकांवर हल्ले करण्यात आले आहेत.
कतारमध्ये हवाई हल्ले
कतारची राजधानी दोहामध्ये अनेक ठिकाणी मोठे स्फोट झाले. एएफपीच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, युद्धाच्या बाराव्या दिवशी इराणने इस्रायलसह कतारवर मिसाईल्स, ड्रोन्स डागले. कतारच्या गृह मंत्रालयाने लोकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
धोका अतिशय वाढला असून, नागरिकांनी घरातच रहावे, तसेच खिडक्यांपासून आणि मोकळ्या जागेपासून दूर रहावे असेही आवाहन केले आहे.
अमेरिकेचा सर्वात मोठा पाचवा तळ
इराणने अमेरिकेचे हवाई तळे असलेल्या शेजारी देशातही हल्ले केले आहेत. सौदी अरेबियाने म्हटले आहे की, त्यांच्या तेल ठिकाणांच्या दिशेने येत असलेले दोन ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. बहरीनमध्येही सायरन बाजत असून, बहरीनमध्ये अमेरिकेच्या नौदलाचा सर्वात मोठ्या तळांपैकी पाचवा तळ इथे आहे.
इराणच्या आयआरजीसीने म्हटले आहे की, अमेरिकेच्या कतारमधील अल उदैद हवाई तळ, कुवेतमधील अरिफजान तळ आणि इराकमधील हरिर हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवरही हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या महत्त्वाची यंत्रणाच नष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
इराणने मिसाईल्स डागल्यानंतर इस्रायल लष्कराने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. तेल अवीवमध्ये बुधवारी पहाटेच सायरन वाजण्यास सुरूवात झाली. इराणकडून मिसाईल्स डागण्यात आल्याचे रडार यंत्रणेला कळल्यानंतर तेल अवीवमध्ये सायरन वाजण्यास सुरुवात झाली.
अमेरिकेचे १४० सैनिक जखमी
सध्या इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेचे आतापर्यंत १४० जवान जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या जॉईंट चीफ स्टाफचे प्रमुख जनरल डॅन कैनी यांनी सांगितले की, अमेरिकेच्या लष्कराने आतापर्यंत ५००० पेक्षा जास्त ठिकाणी हल्ले केले आहेत.
पेंटागॉननेही मंगळवारी दिलेल्या माहिती सांगितले की, अमेरिकेच्या लष्करातील १४० जवान जखमी झाले आहेत. आतापर्यंत सात जवानांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जवान गंभीर जखमी झाले आहेत. काही जवान उपचार घेऊन पुन्हा नोकरीवर रूजू झाले आहेत.
अमेरिकेचे १०,००० ठिकाणांवर बॉम्ब हल्ले
अमेरिका आणि इस्रायलने दहा हजार नागरी वस्त्यांवर बॉम्ब टाकल्याचा दावा इराणने केला आहे. या हल्ल्यांमध्ये १३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाचा बुधवारी (११ मार्च) १२वा दिवस आहे.
Web Summary : Iran retaliates strongly against US-Israel, launching its largest attack. Cluster bombs hit Israel, including Tel Aviv, and naval vessels near UAE. Qatar faced missile strikes. US base in Bahrain was also targeted. Dozens of US soldiers injured in ongoing conflict.
Web Summary : ईरान ने अमेरिका-इजरायल पर जोरदार जवाबी हमला किया, जो अब तक का सबसे बड़ा है। इजरायल के तेल अवीव सहित कई स्थानों और यूएई के पास नौसैनिक जहाजों पर क्लस्टर बमों से हमला किया गया। कतर पर मिसाइल हमले हुए। बहरीन में अमेरिकी ठिकाने को भी निशाना बनाया गया। संघर्ष में कई अमेरिकी सैनिक घायल।