शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 15:19 IST

इराज इलाही यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना या शतकातील 'नवा हिटलर' म्हणून संबोधले आहे. तसेच, इस्रायल थांबला नाही, तर इराण पुन्हा हल्ला करेल, अशी धमकीही दिली आहे.

इराणनेइस्रायलवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यानंतर, आता इस्रायल-इराण संघर्षात भारताचीही एन्ट्री होण्याची शक्यता आहे. इराणचे राजदूत इराज इलाही यांनी भारतासंदर्भात मोठे विधान केले आहे. मध्यपूर्वेत भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे इराज इलाही यांनी म्हटले आहे. याशिवाय, इराज इलाही यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना या शतकातील 'नवा हिटलर' म्हणून संबोधले आहे. तसेच, इस्रायल थांबला नाही, तर इराण पुन्हा हल्ला करेल, अशी धमकीही दिली आहे.

इराणचा इस्रायलला इशारा -इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही एनडीटीव्हीसोबत बोलताना म्हणाले, इराणचा हल्ला म्हणजे इस्रायलला प्रत्युत्तर आहे. एवढेच नाही तर, इस्रायलने इराणच्या संपत्तीवर आणि त्यांच्या हितसंबंधांवर हल्ले करणे सुरूच ठेवले, तर इराण पुन्हा पुन्हा हल्ले करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पुढे बोलताना इराज इलाही म्हणाले, इस्रायलकडून जे हल्ले केले जात आहेत, त्याकडे संपूर्ण जगातील लोकांचे लक्ष आहे. इस्रायलने सर्व मानवाधिकार कराराचे उल्लंघन केले आहे. गाझा आणि दक्षिण लेबनॉनमध्ये सातत्याने रक्तपात होत आहे. यामुळे लोक संतप्त आहेत.

यापुढे बोलताना ते म्हणाले, इस्रायली पंतप्रधान या शतकातील 'नवे हिटलर' आहेत. इस्रायलवरील मिसाइल हल्ले म्हणजे प्रत्युत्तरात केलेली कारवाई असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, इराण आपल्या आंतरराष्ट्रीय हीत आणि राष्ट्रीय सुरक्षिततेसंदर्भात चेष्टा करत नाही. 

'भारताचा दोन्ही देशांसोबत घनिष्ठ संबंध' - इराज इलाही म्हणाले, मिडिल ईस्टमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यामागचे कारण सांगताता इलाही म्हणाले, भारताचा इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांसोबत घनिष्ट संबंध आहे. इस्रायलला समजावण्यात आणि रोखण्यात भारत मदद करेल, अशी आशाही इराज इलाही यांनी व्यक्त केली आहे. यावेळी, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या 'हे युद्धाचे युग नाही', या विधानाचा उल्लेख करत, आम्ही इराणमध्येही हे मानतो, पण जर एखाद्या देशाने दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वावरच हल्ला केला तर तो देश काय  करू शखतो?' असेही ते म्हणाले.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धIndiaभारत