इराणची मोठी तयारी! आता मानव नाही, रोबोट युद्ध लढणार; घेणार 'रोबो सोल्जर्स'ची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:32 IST2025-01-22T16:26:08+5:302025-01-22T16:32:51+5:30
इराण लष्कर आता मोठा बदल करण्याची तयारी करत आहे. त्यांच्या सेनेत आता रोबोटीक्सचा वापर मोठ्या प्रमाणात वापरणार आहे.

इराणची मोठी तयारी! आता मानव नाही, रोबोट युद्ध लढणार; घेणार 'रोबो सोल्जर्स'ची चाचणी
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे पर्व सुरू झाले आहे. तर इराण आता मोठी तयारी करत आहे. इराणने आता लष्करामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, इराणच्या लष्करात आता रोबो सैनिक दिसणार आहेत. याबाबत इराणने तयारी सुरू केली आहे. इराणी सैन्य लढाऊ रोबोट्सची चाचणी घेत आहे आणि त्यांचे अनेक नवीन मॉडेल विकसित करत आहे. इराणी सैन्याने दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या युद्ध सरावांमध्ये रोबोट योद्ध्यांचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे.
केजरीवाल सरकारने 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा केला; काँग्रेसचा धक्कादायक आरोप
इराणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणी सैन्याने रविवारी रात्रीपासून ईशान्य इराणमध्ये सुरू असलेल्या युद्ध सरावांमध्ये त्यांना तैनात केले आहे, या सरावांमध्ये इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आर्मी, बासीज आणि कोस्ट गार्डसह विविध सैन्यांचा समावेश आहे.
लढाऊ रोबोट
लढाऊ रोबोट हे एक प्रकारचे युद्ध वाहन आहे, याला मानवी तैनातीची आवश्यकता नसते. ते पृथ्वीवर आणि आकाशातही आपले काम करू शकते. मानवरहित ड्रोन आधीच आकाशात कामगिरी करत आहेत आणि अलिकडच्या युद्धांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. इराणने मानवरहित हवाई वाहनांप्रमाणेच मानवरहित जमिनीवरील वाहने विकसित केली आहेत, ही युद्धाच्या अग्रभागी हल्ले करतील. या रोबो फायटिंग मशीन्स स्वायत्त रोबोट्सऐवजी रिमोट-कंट्रोल केलेल्या वाहने असतात. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे.
या ताफ्यात बख्तरबंद तोफखाना, ड्रोन ऑपरेटर मशीन, इलेक्ट्रॉनिक युद्ध युनिट्स यांचा देखील समावेश असतो. मानवी योद्ध्यांप्रमाणेच, रोबोट योद्धे युद्धभूमीवर शत्रूंना लक्ष्य करण्यास आणि त्यांच्या जागा नष्ट करण्यास सक्षम असतात. ते कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात ऑपरेशन्स करू शकते. अनेक भागात हे रोबोट सैनिक मानवी सैनिकांपेक्षा कितीतरी पट जास्त शक्ती वापरू शकतात कारण त्यांचे संरक्षण कवच खूप मजबूत असते.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आली आहे, कालच त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे. तर इराण लष्करामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. इराणी सैन्याने रोबोट सैनिकांची चाचणी सुरू केली आहे. इराणला ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळाप्रमाणे या कार्यकाळातही इराणवर मोठा आंतरराष्ट्रीय दबाव आणू शकतात अशी भीती आहे.