शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

VIDEO: इराणच्या हल्ल्यानंतर दोहामध्ये दहशत; सायरन वाजताच मॉलमध्ये पळत सुटल्या महिला आणि मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 11:33 IST

अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणने कतारवर मोठा हल्ला केला.

Iranian Missile Attacks on Qatar: अमेरिकेने तीन अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केल्यानंतर इराणनेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. इराणने करारच्या दोहा येथील अमेरिकन हवाई तळावर हल्ला केला. इराणच्या हल्ल्यानंतर दोहा शहरात खळबळ उडाली होती. कतारची राजधानी दोहा शहर सोमवारी रात्री स्फोटांच्या आवाजाने हादरले. इराणच्या हल्ल्यानंतर संपूर्ण शहरात सायरन वाजू लागले होते. यावेळी नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालं. इराणच्या हल्ल्यानंतर दोहामधील एका मॉलमध्ये गोंधळ उडाल्याचे  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सोमवारी इराणने अमेरिकेला लक्ष्य केले. इराणने कतारची राजधानी दोहा येथील अल उदेद हवाई तळावर लहान आणि मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १० पैकी ९ क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली आहेत. या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कतारने म्हटले आहे. मात्र या हल्ल्यांमुळे दोहामध्ये दहशत निर्माण झाली आहे.

इराणच्या हल्ल्यानंतर कतारच्या नागरिकांना भयानक हवाई हल्ला अनुभवायला मिळाला. रात्री इराणने कतारमधील अल-उदेद एअरबेसला लक्ष्य केले. या हल्ल्याचा  कतारमधील लोकांना त्यांच्या देशात अशा हवाई हल्ल्यांचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. इराण हल्ल्यांदरम्यान दोहामधील एका मॉलचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये लोक लोक मॉलमधून बाहेर पळताना दिसत आहेत. यामध्ये मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. मॉलमधले लोक इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. ते कसं तरी मॉलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. सायरन ऐकताच लोक ओरडत धावू लागले.

सोमवारी रात्री उशिरा दोहामध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. संपूर्ण शहरात हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आणि सायरनचे आवाज येऊ लागला. हल्ल्यानंतर लगेचच कतार, कुवेत, बहरीन आणि युएईने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संपूर्ण प्रदेशात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने इराणच्या अणु तळांवर टाकलेल्या बॉम्बइतकीच क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या तळावर टाकण्यात आली असं इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटलं.  

टॅग्स :IranइराणQatarकतारAmericaअमेरिका