"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 08:15 IST2026-04-11T08:10:30+5:302026-04-11T08:15:06+5:30

अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेसाठी इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल झाले आहे.

Iranian Delegation Arrives in Pakistan Says Talks Only if Conditions Met | "अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा

"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा

Iran Delegation Arrives in Pakistan: गेल्या ४५ दिवसांपासून युद्धाच्या छायेखाली वावरणाऱ्या जगासाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम कायमस्वरूपी शांततेत बदलण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर दोन्ही देशांमधील ही महत्त्वाची भेट मानली जात असून, संपूर्ण जगाचे लक्ष या इस्लामाबाद टॉक्सकडे लागले आहे.

दोन्ही देशांचे 'हाय-प्रोफाइल' शिष्टमंडळ दाखल

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबफ यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ शुक्रवारी इस्लामाबादमध्ये पोहोचले आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्री अब्बास आराखची, संरक्षण परिषदेचे सचिव अली अकबर अहमदियान आणि सेंट्रल बँकेचे गव्हर्नर अब्दोलनासेर हेम्मती यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांनी या शिष्टमंडळाचे पाकिस्तान एअरफोर्सच्या विमानतळावर स्वागत केले.

दुसरीकडे, अमेरिकेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पाकिस्तानकडे रवाना झाले आहे. या टीममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी जॅरेड कुशनर आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांचाही समावेश आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी स्वतःहून उघडेल- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेवर भाष्य केले. "एक चांगला करार म्हणजे - नो न्यूक्लियर वेपन्स. ९९ टक्के करार हाच आहे. जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाची असलेली स्ट्रेट ऑफ होर्मुज ही सामुद्रधुनी लवकरच उघडली जाईल आणि जागतिक ऊर्जा संकट संपुष्टात येईल," असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

इराणच्या कठोर अटी आणि लेबनॉनचा पेच

चर्चेच्या टेबलावर बसण्यापूर्वीच इराणने आपल्या अटी स्पष्ट केल्या आहेत. इराणचे म्हणणे आहे की, लेबनॉनमध्ये हिजबुल्लावरील इस्रायली हल्ले त्वरित थांबले पाहिजेत. तसेच निर्बंधांखाली असलेली इराणची संपत्ती परत मिळायला हवी. इराणने मांडलेल्या १० कलमी प्रस्तावात होर्मुजच्या सामुद्रधुनीवर स्वतःचे नियंत्रण आणि ट्रांझिट फी वसूल करण्याची मागणी केली आहे.

वाटाघाटी सुरू असतानाच रक्ताचा सडा

एकीकडे शांततेच्या गप्पा सुरू असताना जमिनीवर मात्र हिंसाचार सुरूच आहे. दक्षिण लेबनॉनमधील नबातीह शहरात शुक्रवारी झालेल्या इस्रायली हल्ल्यात १३ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला. बुधवारपासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत ३५७ जणांचा बळी गेला असून १,२०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 

Web Title : बातचीत शर्तों के साथ: ईरान का प्रतिनिधिमंडल पाकिस्तान में, अमेरिका को चेतावनी

Web Summary : ईरान और अमेरिका के प्रतिनिधिमंडल पाकिस्तान में शांति वार्ता के लिए मिले। ईरान ने लेबनान में इजरायली हमलों को रोकने और संपत्ति वापस पाने जैसी शर्तें रखीं। बातचीत के बीच लेबनान में हिंसा जारी है, हताहतों की संख्या बढ़ रही है।

Web Title : Iran Delegation in Pakistan for Talks; Conditions Apply, US Warned

Web Summary : Iran and US delegations meet in Pakistan for crucial peace talks amid escalating tensions. Iran sets conditions including halting Israeli attacks in Lebanon and regaining assets. Violence continues in Lebanon despite negotiations, with rising casualties.