शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोरानानंतर आता पुन्हा लागणार मोठं लॉकडाऊन? जगभऱात अशी सुरू आहे पूर्वतयारी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 17:16 IST

Iran War: इराण युद्ध आणि होर्मुझमधील नाकेबंदीमुळे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इंधनाचा तुटवडा जाणवू लागा आहे. इंधनाचा तुटवडा आणि महागाईमुळे या संकटावर मात करण्यासाठी जगभरात लॉकडाऊन लावावं लागतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धानं आता भीषण रूप धारण केलं आहे. युद्धाला सुरुवात होऊन २३ दिवस लोटत आले तरी शांतता प्र्स्थापित होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही आहेत. त्यातच इराणने जगभरातील इंधन वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्याने भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इंधनाचा तुटवडा जाणवू लागा आहे. खनिज तेलाच्या किमती ११२ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. अमेरिकेत तर गॅसच्या किमती  ५ डॉलर प्रति गॅलनपर्यंत पोहोचल्या आहेत. वाहतुकीचा खर्च वाढल्याने प्रत्केक गोष्ट महाग होत चालली आहे. तसेच इंधनाचा तुटवडा आणि महागाईमुळे या संकटावर मात करण्यासाठी जगभरात लॉकडाऊन लावावं लागतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

युद्धामुळे सध्या दुकानांमध्ये सारं काही महाग होत चाललं आहे. पिकांसाठी आवश्यक असणारी खतेही आखातामधून येत असल्याने अन्नसुरक्षाही धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांना खतांसाठी अधिक पैसे मोजावे लागले तर अन्नपदार्थही महाग होण्याची शक्.ता आहे. 

या युद्धाचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा फटका हवाई वाहतुकीलाही बसत आहे. त्यामुळेच युनायटेड एअरलाइन्सने या आठवड्यात ५ टक्के उड्डाणांमध्ये कपात केली आहे. इतर देशांमधील विमान कंपन्या देखील उड्डाणांमध्ये कपात करत आहेत. आवश्यक नसल्यास विमान प्रवास करू नका, असे सरकारांकडून सांगण्यात येत आहे. अशाच प्रकारची आवाहनं कोरोनाच्या काळात सुरुवातीला करण्यात आली होती. तसेच नंतर लॉकडाऊन लावण्यात आलं होतं.  इंधन टंचाईमुळेअनेक देशांत तेलाचं रेशनिंग करण्यात येत आहे. जपानमध्ये तेलाचं रेशनिंग सुरू करण्यात आलं आहे. बांगलादेश, फिलीपाईन्स आणि श्रीलंकेमध्ये पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने अनावश्यक प्रवास टाण्याचं आवाहन केलं आहे. भारतामध्येही ८० टक्के तेल हे होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून येतं. तिकडे आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला आता तेलाच्या टंचाईने अधिकच अडचणीत आणले आहे.  यादरम्यान, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने इंधन दरवाढीच्या संकटापासून सुरक्षा या नावाने दहा कलमी योजना प्रसिद्ध केली आहे. यामधून विविध देशांच्या सरकारांना वाहनं चालवण्यासाठी नंबर प्लेटच्या आधारावर दिवस निश्चित करण्याचे, प्रत्येक महामार्गावर वेगमर्यादा कमी करण्याचे, विमान प्रवास शक्यतो टाळण्याचे.गॅस ऐवजी इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करण्याचे,तसेच शक्य असल्यास घरातूनच काम करण्याचे आवाहन केले आहे.   आता इराणमध्ये सुरू असलेलं युद्ध आणखी काही काळ चाललं आणि तेलाच्या किमती वाढल्या तर वाहतूक, उड्डाणे, शेती सारं काही महाग होईल. आता विविध देशातील सरकारांकडून इंधनाचं रेशनिंग आणि वेगमर्यादा लागू केली जाईल. आयईएची योजना विविध देशात लागू केली जाईळ. तसेच डिजिटल परमिट सिस्टिम ही कायमस्वरूपी व्यवस्था बनू शकते. तसेच त्यामध्ये तुमची गाडी, प्रवास आणि घरगुती उपकरणं नियंत्रित होईल.  

English
हिंदी सारांश
Web Title : Global lockdown looms amid Iran conflict, fuel crisis: Preparations underway.

Web Summary : Iran war fuels global fuel shortage, spiking prices. Lockdowns loom as rationing begins, flights cut. IEA proposes restrictions, urging reduced travel and energy conservation amid rising costs.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIranइराणWarयुद्धCrude Oilखनिज तेलIndiaभारत