शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Iran vs America War: इराणच्या भूमीवर अमेरिका सैन्य उतरवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 09:40 IST

Iran America War Latest News: इराण विरोधात अमेरिका-इस्रायलने युद्ध सुरू करून आता चार दिवस उलटले आहेत. दोन्ही बाजूने हवाई हल्ले सुरूच असून, अमेरिका इराणच्या भूमिवर आपले सैन्य उतरवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकायुद्ध सुरू होऊन आज चार दिवस झाले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांची हत्या करण्यात आल्यानंतर इराणचे इस्रायल-अमेरिकेविरोधात हल्ले वाढले आहेत. हे युद्ध आणखी किती चिघळणार आणि कधीपर्यंत चालणार, याबद्दल अद्याप तरी चित्र स्पष्ट दिसत नाहीये. कारण इराणमध्ये सत्तांतर घडवून आणायचं की नाही, याबद्दल ठोस भूमिका मांडलेली नाही. पण, इराणमध्ये सैन्य उतरवण्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे विधान केले आहे.

अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या लष्करी ठिकाणे, शस्त्र भंडार आणि इतर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जागांवर हल्ले केले जात आहेत. राजधानी तेहरानसह इराणच्या १३३ शहरांमध्ये हल्ले होत असून, त्यात मोठी जीवित हानीही झाली आहे. मात्र, इराणकडूनही तीव्र हल्ले सुरू असून, अशा वेळी अमेरिका इराणमध्ये आपले सैन्य उतरवणार का? असा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. 

अमेरिका इराणमध्ये सैन्य उतरवणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

इराण शस्त्र सज्जतेबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, "लांबपर्यंत मारा करणाऱ्या मिसाईल्स आणि अण्वस्त्रांच्या संदर्भात इराणची वाढती शक्ती फक्त मध्य पूर्वच नव्हे, तर अमेरिकेच्या लोकांसाठीही धोकादायक आहे."

ट्रम्प असेही म्हणाले की, "प्रत्येक राष्ट्राध्यक्ष म्हणतात की, इराणच्या भूमिवर सैन्य पाठवले जाणार नाही. पण, मी असे म्हणणार नाही. मी म्हणेन की, कदाचित आम्हाला त्याची गरज पडू नये. पण, गरज निर्माण झालीच तर सैन्यही पाठवू शकतो."

अमेरिका खरंच सैन्य उतरवू शकते का, तज्ज्ञ काय म्हणतात?

ट्रम्प यांनी इराणच्या भूमिवर सैन्य उतरवण्याबद्दल विधान केले असले तरी त्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. भू राजकीय अभ्यासकांच्या मते सद्यस्थितीत अमेरिका आपले सैन्य इराणच्या भूमीत उतरवण्याची शक्यता कमी आहे.  कारण अजूनही हे स्पष्ट झालेले नाही की, अमेरिकेला या युद्धातून काय मिळवायचे आहे. अमेरिकेने ईराणवर हवाई हल्ला केला, पण त्यांच्यासाठी जमिनीवर सैन्य उतरवणे लष्करी आणि राजकीय दृष्ट्‍याही सोप्पं नसेल, असे संरक्षण अभ्यासक प्रवीण साहनी यांनी बीबीसी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे. 

युरोपीय कमांडचे अमेरिकेचे माजी डेप्युटी कमांडर जनरल चार्ल्स वॉल्ड यांच्यामते इराणच्या भूमिवर सैन्य घुसवण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यांनी आपल्या एका लेखात म्हटले आहे की, इराणमध्ये सत्तांतर घडवण्यासाठी अमेरिका सैन्य उतरवणार असे वाटत नाही. 

अमेरिकेच्या गाठीशी इराण आणि अफगाणिस्तान युद्धाचा अनुभव आहे. ट्रम्प असो किंवा आणखी कुणी, मध्य पूर्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य उतरवणे देशातंर्गत राजकारणाच्या दृष्टीने खूप घातक पाऊल ठरू शकते, असेही वॉल्ड यांनी म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : US military on Iranian soil? Trump's stance amid escalating tensions.

Web Summary : Amidst Iran-Israel-US conflict, Trump hints at possible military intervention in Iran, citing nuclear threats. Experts, however, deem ground invasion unlikely, considering past experiences and domestic political implications, focusing on air strikes.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायलwarयुद्धDefenceसंरक्षण विभाग