VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 17:16 IST2026-04-05T17:15:17+5:302026-04-05T17:16:05+5:30
Iran US War: अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी इराणने जाहीर केले बक्षीस!

VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Iran US War: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सैन्याने मोठी बचाव मोहीम राबवत इराणमध्ये अडकलेल्या आपल्या एअरफोर्स अधिकाऱ्याची सुटका केल्याचा दावा केला आहे. सुमारे ४८ तासांच्या कारवाईनंतर या पायलटला सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे अमेरिकेने सांगितले. मात्र, या बचाव मोहिमेदरम्यान अमेरिकेची काही विमाने पाडल्याचा दावा इराणने केला आहे.
Khatam al-Anbiya Headquarters:
— Consulate General of the I.R. Iran in Mumbai (@IRANinMumbai) April 5, 2026
A rescue operation planned by Israel and the U.S. at an abandoned airport in Isfahan failed due to the timely intervention of our forces.#Iran#Israel#US#Warpic.twitter.com/GL7fmxXiAS
विमान पाडल्याचा इराणचा दावा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्स (IRGC) अंतर्गत कार्यरत खातम अल-अनबिया मुख्यालयाचे प्रवक्ते इब्राहिम जोल्फागरी यांनी इराणी सरकारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, इस्फहानच्या दक्षिण भागात अडकलेल्या अमेरिकन पायलटला वाचवण्यासाठी अमेरिकेने विशेष लष्करी मोहीम राबवली होती, मात्र ती मोहीम अयशस्वी ठरली. यादरम्यान, आम्ही अमेरिकेचे दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि एक C-130 सपोर्ट विमान पाडले. या कारवाईत ५ जणांचा मृत्यूही झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
If the United States gets three more victories like this, it will be utterly ruined. 👏 pic.twitter.com/jutDghVrjz
— محمدباقر قالیباف | MB Ghalibaf (@mb_ghalibaf) April 5, 2026
पायलट सुरक्षित, अमेरिकेचा दावा
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, इराणने F-15E फायटर जेट पाडल्यानंतर बेपत्ता झालेल्या अमेरिकन पायलटची सुटका करण्यात आली आहे. अमेरिकन इतिहासातील सर्वात धाडसी सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशनपैकी एक मोहीम आमच्या सैन्याने पार पाडली आणि आमच्या अधिकाऱ्याला सुरक्षित परत आणले.हा पायलट जखमी आहे, पण त्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो लवकर बरा होईल.
पायलटला पकडण्यासाठी इराणने जाहीर केले बक्षीस
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी मदत करणाऱ्यांना ६०,००० डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामुळे या पायलटच्या शोधासाठी इराणनेही मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, या घटनेमुळे मिडल ईस्टमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.