शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इराणने तयार केले स्वतःचे फायटर जेट, अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 16:28 IST

अमेरिकेने करार समाप्त करुन इराणवर निर्बंध लादल्यानंतर इराणही अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे.

तेहरान- इराणने देशांतर्गतच फायटर जेट बनवले असून त्याचे प्रदर्शनही मंगळवारी करण्य़ात आले. इराणच्या नॅशनल डिफेन्स इंडस्ट्री एक्झिबिशनच्या कार्यक्रमात कोव्सर हे विमान प्रदर्शित करण्यात आले. यावेळेस इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी कोव्सरच्या कॉकपिटमध्ये बसल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अमेरिका आणि इराम यांचे संबंध तणावपूर्ण झाल्यानंतर इराण अनेक मार्गांनी आपली संरक्षणसिद्धता दाखविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

हे विमान 100 टक्के इराणमध्ये तयार करण्यात आले असून ते फोर्थ जनरेशन फायटर विमान आहे, त्यात बहुउद्देशिय रडार बसविण्यात आल्याचा दावा तास्मिन न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तात करण्यात आला आहे.इराणच्य़ा सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने या विमानाच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. शनिवारी या विमानाची घोषणा  करण्यात आली. संरक्षणमंत्री आमीर हतामी यांनी या विमानाची घोषणा केली.

या विमानाबद्दल माहिती देताना हतामी म्हणाले, इराकबरोबर युद्धाच्यावेळेस जालेल्या हवाईयुद्धामध्ये इराणचे नुकसान झाले होते, त्यामुळे असे विमान तयार करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. इराणला इस्रायलकडून सतत असणारी हल्ल्याची भीती तसेच इराणबरोबर 'सर्व पर्याय विचारात आहेत' असे म्हणणाऱ्या अमेरिकेमुळेही हे विमान तयार करावे लागले.इराण-इराक युद्धामुळे आम्ही कोणावरही अवलंबून राहू शकत नसल्याचे आमच्या लक्षात आले आहे, आमच्याकडील संसाधने मर्यादित आहेत, त्यामुळे आम्हाला संरक्षणासाठी कमीत कमी खर्चात प्रयत्न करावे लागणार होते असे हतामी यांनी सांगितले.

अमेरिकेची पाठ वळताच चीनची इराणमध्ये घुसखोरीअमेरिकेने इराणबरोबरचा करार रद्द केल्यानंतर चीनने इराणशी संबंध वाढवायला सुरुवात केली आहे.जून 2017पर्यंत चीनने 33 अब्ज डॉलर्सची इराणमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच पाणीपुरवठा, ऊर्जा, वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी 10 अब्ज डॉलर्सची मदतही चीनने इराणी बँकांना केली आहे. तसेच बुशहेर या बंदरापासून इराणमधील विविध शहरांमध्ये जाण्यासाठी 70 कोटी डॉलर्सची मदतही चीनने केली आहे. इराणमधील नैसर्गिक वायूक्षेत्रातून फ्रेंच कंपनीने माघार घेतली तर त्याची जागा घेण्यासाठी चीन तयारच आहे. चीन हा क्रूड ऑइल आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. इराण हा चीनला तेलाची निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांचा सर्वात जास्त तोटा युरोपियन कंपन्यांना होणार आहे. 

टॅग्स :IranइराणairplaneविमानUSअमेरिका