शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानात परकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही...; पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या बॉम्बिंगवरून इराण भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:57 IST

अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्स तालिबानी दहशतवाद्यांशी सातत्याने लढत आहे. रविवारी, नॉर्दर्न अलायन्सने दावा केला, की पाकिस्तानच्या हवाई दलाने पंजशीरच्या भागात ड्रोन हल्ले केले आणि तालिबानची साथ दिली. 

अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे इराण भडकला आहे. कोणत्याही बाह्य शक्तीने, अशा प्रकारे हल्ला करणे चुकीचे असून याची चौकशी व्हायला हवी, असे इराणने म्हटले आहे. (Iran statement over pakistan attack in panjshir in Afghanistan)

अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्स तालिबानीदहशतवाद्यांशी सातत्याने लढत आहे. रविवारी, नॉर्दर्न अलायन्सने दावा केला, की पाकिस्तानच्या हवाई दलाने पंजशीरच्या भागात ड्रोन हल्ले केले आणि तालिबानची साथ दिली. 

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सोमवारी पाकिस्तानच्या या कृत्याचा निशेध केला आहे. काल रात्री झालेला हा हल्ला निंदनीय आहे. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या अफगाण नेत्यांना त्यांनी श्रद्धांजली, असे इराणने म्हटले आहे.

पंजशीरमध्ये रक्तरंजित लढाई सुरूच; 600 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा, 1000 हून अधिकांनी गुडघे टेकले

पंजशीरवरून संघर्ष सुरूच -तालिबानी दहशतवादी बऱ्याच दिवसांपासून पंजशीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, नॉर्दर्न अलायन्सकडून तालिबानी दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले जात आहे. दरम्यान, तालिबानने पंजशीर ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, नॉर्दन अलायन्सने तालिबानचा हा दावा फेटाळून लावला आहे. खुद्द नॉर्दन अलायन्सनेच पाकिस्तानकडून मदत पुरवली जात असल्याचा खुलासा केला होता. यापूर्वी नॉर्दन अलायन्सने युद्धबंदीचे आवाहन केले होते, पण तालिबानने ते नाकारले. तसेच, कोणताही मुद्दा चर्चा करून सोडविण्याची आपली इच्छा आहे, असेही तालिबानने म्हटले होते. 

पंजशीर युद्धात पाकिस्तानची थेट उडी; हवाई दलाकडून जोरदार बॉम्बफेक सुरु

टॅग्स :IranइराणAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानTerrorismदहशतवाद